मॉन्सूनच्या परतीला प्रवासाला सुरुवात :नाशिक जिल्ह्यात पुढील काही दिवस जोरदार पाऊस
हवामान अभ्यासक दीपक जाधव यांची माहिती
नाशिक,दि.२६ सप्टेंबर २०२३ – मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असला तरी नाशिक जिल्ह्यासह परिसरात पुढील ५ दिवस ठिकठिकाणी वळीव स्वरूपाचा जोरदार असा पाऊस होणार आहे आज दुपार नंतर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान अभ्यासक दीपक जाधव यांनी जनस्थानशी बोलतांना सांगितले.
आज २६ सप्टेंबर आजही नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी वळीव स्वरूपाचा जोरदार असा पाऊस होईल पण हा पाऊस कुठे होईल हे निश्चित नसते स्थानिक वातावरण तयार होऊन हा पाऊस पडतो
दिनांक २७ ,२८ ,२९, ३० या तारखेला जोरदार असा वळीव पाऊस नाशिक जिल्ह्यात होईल त्यावेळी धरण साठा मध्ये वाढ होईल आणि नद्या ना देखील पाणी येईल १ आणि २ ऑक्टोबर ला ही वळीव पाऊस राहील मात्र ३ तारखे पासून पाऊस कमी होईल ४ ते ११ ऑक्टोबर ढगाळ वातावरण राहील ९ ऑक्टोबर ला थोडेफार पावसाची शक्यता आहे ४ ते ८ सप्टेंबर ला खूप धुके आणि दव पडेल UV index extrime Level ला जाईल त्या काळात तापमान वाढेल
काल सर्वात प्रथम skymet या खाजगी हवामान संस्थेने सर्वात प्रथम घोषणा केली की राजस्थान चे उत्तर पश्चिम बाजूने मॉन्सून ने रिटर्न परतीचा प्रवास सुरू केलेला आहेत मॉडेल आधारित पावसाचे फक्त ७ दिवस नाशिक जिल्ह्यात पाऊस होईल घड्याळ चे दिशेने वारे फिरायला लागले की अँटीसायक्लोन तेव्हा उत्तर भारतातली हवा मॉन्सून ला दक्षिण बाजूला लोटते नैऋत्य मान्सून माघारी फिरतो ही हजारो वर्षे रिटर्न मॉन्सून ची क्रिया आहेत आता पुढील परिस्थिती बघू
काल(दि.२५ सप्टेंबर) देखील नाशिक जिल्ह्यात वळीव स्वरूपाचा पाऊस अनेक तालुक्यातील अनेक गावात झाला वडनेर भैरव आणि परिसर दिंडोरी तालुका पूर्व भाग सटाणा मधील पिंगळवडे परिसर देवळ तालुका मधील भुउर चा परिसर नाशिक मखमलाबाद परिसर आणि अनेक ठिकाणी वळीव आणि जोरदार पाऊस झाला आता पुढचा पाऊस कसा असेन ते बघू
मॉडेल आधारित २ किंवा ३ ऑक्टोबर ला पाऊस कमी होणार असला तरी ढगाळ वातावरण १२ ऑक्टोबर पर्यंत तयार होत राहील त्या काळात हवामानातील उष्णता वाढेल पण वळीव पाऊस २ गोष्टी मुळे येतो एक म्हणजे समुद्र वरून येणारे बाष्प आणि ऑक्टोबर हीट मुळे निर्माण होणारे जमिनी वरील पाण्याचे बाष्पीभवन होऊन येणारे बाष्प त्यास स्थानिक वातावरण असे म्हणतात आणि हा पाऊस आपलकडे वळीव स्वरूपाचा येतो कदाचित ३ तारखे नंतर मॉन्सून चां पाऊस थांबणार असला तरी थोडे फार बाष्प राहणार आहे आणि स्थानिक बाष्प असणार त्यामुळे कदाचित ३ नंतर ही ठिकठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे पण शक्यता ४० टक्के वर आहेत
नाशिक जिल्ह्यामधील पावसाचा आणि धरणं साठा मधील अढावा घेतला तर पश्चिम बाजू गंगापूर ,भावली ,गौतमी गोदावरी ,कश्यपी ,दारणा ,भावली हे धरणे १ महिने आधीच भरले आहेत त्यामुळे तेथील शेती सिंचन आणि पिण्याचा प्रश्न मिटला दुसरा समूह दिंडोरी तालुका ५ ही धरणे जवळपास भरली आहेत तिसगाव थोडे कमी पण तरी देखील त्यामुळे दिंडोरी आणि त्यावरील ज्या नद्या आणि कालवे या अंतर्गत येणारे सिंचन आणि पिण्याचा प्रश्न मिटणार आहे.
चनकापुर हरणबारी मधे देखील चांगलं पाणी साठा आहेत त्यामुळे त्यांचा प्रश्न मिटला आहे मात्र. पूर्व भाग चांदवड तालुका मालेगाव ,मनमाड नांदगाव , देवळा , सटाणा कळवण पूर्व चा काही भाग , येवला निफाड चां पूर्व भाग सिन्नर चा दापुर वडांगळी पांगरी आणि सिन्नर चां खूप मोठा परिसर अजून पाऊस नाही जेमतेम वळीव पाऊस पडले असले तरी रब्बी चे पिके या तालुक्यात निघणे थोडे अवघड झाले आहे अजून अशी काही गावे आहेत जिथे पेरणी देखील झाली नाही.
सिन्नर तालुक्यात आता आपल्या हातात फक्त ८ दिवस राहिले ते देखील वळीव छोटे मोठे गाव बंधारे लघु पाटबंधारे योजना आणि नद्या अजून कोरड्या आहेत त्या जर भरल्या तरच पाणी प्रश्न मिटणार आहे पुढील ८ दिवसात मॉडेल आधारित चांगला पाऊस असला तरी वळीव पाऊस सर्व दूर नसतात
बंगाल चे उपसागरात ४ ते ६ ऑक्टोबर ला निर्माण होणारे कमी दाब पट्टा डिप्रेशन ,हे चक्रीवादळ पर्यंत जाणार नाही असे दिसते त्याचा मार्ग मध्य भारतातून जाणार होता पण मॉन्सून रिटर्न होत असल्याने उत्तर भारतात दाब निर्माण होतो त्यामुळे हे वादळ किंवा कमी दाब पट्टा बांगलादेश कडे जाणार असे दिसते एक मॉडेल GFS नुसार थोडे फार भारतात enter होईल असे दिसते.असं हवामान अभ्यासक दीपक जाधव यांनी सांगितले आहे
दिपक जाधव,(हवामान अभ्यासक)
कृषी पदवीधर राहुरी कृषी विद्यापीठ
जोपुळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक
मोबाईल -9422322138
वरील अंदाज देण्याचे सोर्स
Predection sourceहवामान अंदाज या मॉडेल मधून सांगितले आहे
ECMWF वेदर मॉडेलयुरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर फॉरकॉस्ट
GEM Global Environmental Multiscale Model अमेरिका
GFS – 22 model ग्लोबल फॉरकॉस्ट सिस्टीम
BOM ब्युरो of मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलियन वेदर®
ARPGE -40NEMS -30JTWC
IMD इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट भारतीय हवामान खातेIIMT पुणे