मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना ५ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.आज राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपणार होती त्यासाठी त्यांना आज सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले असता.न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ५ सप्टेंबर पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहे.
गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांची ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती,कोठडी संपत असल्याने राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले. ईडीने संजय राऊत यांची कोठडी मागितली नाही. त्यामुळे कोर्टाने राऊत यांना २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज पुन्हा त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आल्याने त्यांना ५ सप्टेंबर पर्यंत आर्थररोड कारागृहात राहावे लागणार आहे.