मुंबई, दि. १६ सप्टेंबर २०२५ – Kamli Serial Kabaddi Episode लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली मालिका ‘कमळी’ लवकरच एका भन्नाट आणि वेगळ्या ट्रॅकसह प्रेक्षकांसमोर येणार आहे. यावेळी मालिकेत प्रेक्षकांना कबड्डीचा रोमांचक थरार पाहायला मिळणार असून, टीम कमळी आणि टीम अनिका आमनेसामने भिडणार आहेत. या विशेष ट्रॅकची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री केतकी कुलकर्णी (अनिका) हिने या ट्रॅकसाठी खास सराव सुरू केला आहे. कबड्डी खेळाचा फारसा अनुभव नसतानाही तिने प्रॅक्टिसद्वारे अनेक गोष्टी आत्मसात केल्या आहेत. “कबड्डी खेळताना स्टॅमिना आणि फिटनेस महत्त्वाचा असतो. त्यासाठी मी नियमित वर्कआउट, रनिंग, वॉर्मअप आणि योग्य डाएट घेते. जंक फूड टाळून मी स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. तसेच उन्हात खेळताना हायड्रेशनसाठी लिंबूपाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स घेणे आवश्यक असते, याची मी विशेष काळजी घेते,” असं ती म्हणाली.
या मालिकेत येणाऱ्या कबड्डी स्पर्धेमुळे केवळ कथानकाला नवा ट्विस्ट मिळणार नाही, तर प्रेक्षकांनाही एक वेगळा अनुभव घेता येणार आहे. मराठमोळा खेळ असलेली कबड्डी टीव्हीवर एका नवीन रूपात दाखवली जाणार असून त्याची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
Kamli Serial Kabaddi Episode टीम कमळी आणि टीम अनिका यांच्यातील रंगतदार सामना मालिकेला नवा टप्पा देणार आहे. मालिकेतील पात्रांमधील नाट्यमय संघर्ष आता मैदानातल्या कबड्डीच्या रूपात समोर येणार असल्याने चाहते हा ट्रॅक पाहण्यासाठी अधीर झाले आहेत. लवकरच हा धमाल भाग प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार आहे.