केन्सिंग्टन चॅम्पियन लीगचा समारोप : आदित्य शटलर्स संघ विजयी 

नाशिक सुपर जायंट्स यांना उपविजेते पद

0

नाशिक,३ मे २०२३ – नाशिक केन्सिंगटन चॅम्पियन लीग स्पर्धेत संघर्ष पूर्ण झालेला लढतीत आदित्य शटलर्स संघाने विजेतेपद पटकावले केवळ एका पराभवामुळे नाशिक सुपर जायंट्स यांना उपविजेते पदावर समाधान मानावे लागले नाशिक मध्ये प्रथमच स्थानिक स्तरावर ही एकमेव अशी स्पर्धा भरवली गेली त्यामधे खेळाडूंचा लिलाव पद्धतीने बोली लावण्यात आली व जी किंमत त्यांना आली त्यांना ती किंमत रोख स्वरूपात देण्यात आली

पारितोषिक वितरण समारोप आदिवासी विकास आयुक्त मा. नयना गुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी व्यासपीठावर केन्सिंगटन क्लबचे संचालक मा. विक्रम मते, ऋषभ गोलीया, योगेश एकबोटे, पराग एखंडे व मुकेश पवार यांच्या हस्ते झाले

या स्पर्धेत खालील प्रमाणे एकूण सहा संघांनी भाग घेतला १) रॅायल मराठा – कौस्तुभ पवार व आशिष तोरवणे २) एस पी शटलर्स – रत्नाकर आहेर व डॅा. तुषार देवरे ३) रिष पॅावर शटलर्स – रिषभ गोलीया व डॅा. मनिष आहीरे ४) नासिक सुपर जायंट्स – डॅा. प्रीतम जपे व रविंद्र आढाव ५) आदित्य शटलर्स – आदित्य कासार ६) एम एस जे वॅारियर्स – मनोज शिंदे, संतोष जाधव व महेद्र नेटावदे.

या स्पर्धेत ट्रम्प गुणांच्या पद्धतीने सर्व साखळी सामन्यात आदित्य शटलर्स व नासिक सुपर जायंट्स या दोन्ही संघांनी सर्वात जास्त गुण मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला तब्बल साडेतीन तास चाललेल्या या अंतिम लढतीत खेळल्या गेलेल्या सात दुहेरी सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यात फारच संघर्ष दिसून आला पहिल्या सामन्यात आदित्य शटलर्स कडून आदित्य आरडे व अमित देशपांडे यांनी नाशिक सुपर जायंट्स संघातील आदित्य गुप्ता व चंदन जाधव यांचा 21-16 व 21- 8 असा असा पराभव केला दुसऱ्या  सामन्यामध्ये नाशिक सुपर जायंट्स यांच्या कुणाल तोरणे व विशाल करंजकर यांनी आदित्य शटलर्सच्या अद्वैत संकपाळ व पंकज खत्री यांचा 21-17 21-9 अशा पद्धतीने पराभव केला तिसऱ्या सामन्यांमध्ये आदित्य शेटलर करून अर्जुन गुंडे व नीरज पत्की यांनी नाशिक सुपर जायंट्स यांच्या डॅा. प्रीतम जपे व महेश बालानी यांचा 21 -19 व 21 -15 असा पराभव करून सामना जिंकला.

चौथ्या सामन्यामध्ये आदित्य शटलर्स कडुन आदित्य कासार व शान राणा यांचा नाशिक सुपर जायंट्सच्या अनिकेत इंगोले व दिलीप शिरसाट यांनी 14 -21 व 4 -21 असा पराभव करून दोन्ही संघाचे प्रत्येकी दोन दोन गुण झाले पाचव्या सामन्यांमध्ये आदित्य शटलर्स करून दिनेश अडसरे व सचिन वाणी यांनी नाशिक सुपर जायंट्सच्या मदन जोशी व रवींद्र आढाव यांचा 21 -19, 21 -12 असा पराभव केला सहावा सामना महिलांचा झाला तो अतिशय चुरशीचा झाला या सामन्यात आदित्य शटलर्स कडुन प्राजक्ता जाधव व रिया मंडाले यांचा नाशिक सुपर जायंट्सड कडून खुशबू पाखळे व राजश्री सानप यांनी 15-21, 22-20, 13-21 असा पराभव केला त्यामुळे अंतिम सामना हा ३,३ बरोबरीत साधण्यात आला शेवटच्या निर्णायक सामन्यापर्यंत गेलेल्या या अंतिम लढतीत आदित्य शटलर्स यांच्याकडून खेळताना धीरेन तिलवाणी व शैलेंद्र अवस्थी त्या जोडीने आपल्या अनुभवाच्या आधारे  नाशिक सुपर जायंट्सच्या जितेन ठक्कर व संभाजी पाटील यांचा 21-19 व 21-12 असा पराभव करून या स्पर्धेच्या विजेत्या पदावर आपली मोहर उमटवली

या स्पर्धेत विजेत्याला रु. एक लाख रुपये रोख व उपविजेत्याला रु.पन्नास हजार रुपये असे पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिनेश अडसरे, ऋषभ गोलिया, अनुप घाटे, रवी पवार, पराग एखंडे, योगेश एकबोटे, मदन जोशी, विक्रांत करंजकर, आदित्य आरडे, विनायक दंडवते, अश्विन सोनवणे, आशिष तोरवणे व मुकेश पवार आदींनी चांगले परिश्रम घेतले या स्पर्धेची तांत्रिक बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच श्री ब्रिजेश गौर यांनी व यांचे सहकारी यांनी सांभाळली

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.