नाशिक,दि. २७ मार्च २०२३ –येथील केन्सिंगटन क्लब मधील हौशी बॅडमिंटनपटूंच्या पुढाकाराने आणि नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन च्या सहकार्याने दि 28 व 29 एप्रिल रोजी होत असलेल्या केन्सिंगट न चॅम्पियन्स लीग स्पर्धांच्या खेळाडूंचा लिलाव ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. नाशिक मध्ये प्रथमच आशा पद्धतीने लिलाव करून ही स्पर्धा होत आहे. स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक नंतर तंदुरुस्त नाशिक हा संदेश घेऊन नाशिक मध्ये प्रथमच बॅडमिंटन लीग स्पर्धा होत आहे. नाशिकमधील १९ ते ७५ या योगटातील स्री पुरुष खेळाडूंसाठी ही स्पर्धा होत आहे.
यासाठी इच्छुक खेळाडूंची माहिती क्लबने मागवली होती. शहरातील तब्बल २२५ खेळाडूंनी याला प्रतिसाद देत लीग मध्ये खेळण्याची उत्सुकता दाखवली. यासाठी आदित्य कासार यांचा आदित्य शटलर, महेंद्र नेटवटे व संतोष जाधव यांचा एम एस जे वॉरियर्स, डॉ प्रीतम जपे व रवींद्र आढाव यांचा नाशिक सुपर जायंटस्, रिषभ गोलिया व मनीष अहिरे यांचा रिष पॉवर शटलर, आशिष तोरणे यांचा रॉयल मराठा व रत्नाकर आहेर यांचा एस पी शटलर या सहा संघ मालकांनी आपल्या संघात चांगले खेळाडू घेण्यासाठी लिलावात बोली लावली व उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली. या लीग मुळे स्थानिक खेळाडूंना अनुभवी प्रशिक्षकांसोबत खेळण्याचा व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होणार असून, करिअरच्या दृष्टीने त्यांना ही मोठी संधी उपलब्ध करून दिली असल्याचे या स्पर्धांच्या आयोजनात महत्वपूर्ण भूमिका असलेले कॅन्सिंगटन क्लबचे विक्रांत मते यांनी सांगितले.
या प्रसंगी नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, उपाध्यक्ष योगेश एकबोटे, सेक्रेटरी दिलीप लोंढे, बॅडमिंटन प्रशिक्षक अमित देशपांडे, पराग एकंडे, विक्रांत करंजकर, सिद्धार्थ वाघ, अभिषेक पाटील, चंदन जाधव तसेच दिनेश अडसरे,अनुप घटे, रवी पवार, मंजितसिंग धुप्पर, विक्रम उगले, मुकेश पवार, कौस्तुभ पवार, रवींद्र शिंदे, भूषण कुटे, सचिन गायकवाड, मदन जोशी, निलेश ठाकरे, या लिलाव प्रक्रियेप्रसंगी उपस्थित होते.