कीर्ति कला मंदिर तर्फे २३ आणि २४ एप्रिलला ‘सुवर्णरेखा’महोत्सवाचे आयोजन
कार्यक्रमात ६४ संस्था व ६०० हून अधिक कलाकार सहभागी होणार
नाशिक,दि,२२ एप्रिल २०२५ – कीर्ति कला मंदिरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून सुवर्णरेखा या महोत्सवा अंतर्गत कलाहोत्र या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ५० वर्षांपासुन कीर्ति कला मंदिर ही संस्था कथ्थक प्रचाराचे आणि प्रसाराचे कार्य अविश्रांतपणे करत आहे. कलाहोत्र मध्ये कीर्ति कला मंदिरच्या विद्यार्थिनी पाहिले पुष्प गुंफणार असून या संकल्पने अंतर्गत देशविदेशातील नामवंत संगीत, नृत्य, गायन तसेच नृत्यातील प्रकार कथ्थक, भरतनाट्यम्, मणिपूरी, कुचिपुडी, ओडिसी सत्रिय यांसारखे नृत्यप्रकार विविध नामांकित संस्थांचे कलाकार सादर करणार आहेत.
नामवंत संस्थाच्या गुरूंच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात येणार आहे.अतिशय भव्य प्रमाणावर नाशिकमध्ये प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नाशिकमधील सांस्कृतिक वळणावरील हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ह्यावेळी हा कार्यक्रम सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावा आपल्या अभिजात भारतीय नृत्य गायन वादन कलांचं सौंदर्य, प्रत्येक कलावांतचा सृजनात्मक अविष्कार रसिकांनी अनुभवावा ह्या उदयोंमुख कलाकारांना दाद मिळावी आणि प्रत्येक कलाप्रेमी रसिकास ह्या आनंद पर्णवीचे साक्षीदार होता यावे म्हणून कार्यक्रम विनामूल्य सर्वांसाठी खुला ठेवला आहे.
सतत दोन दिवस हे कलाहोत्र अविरत सुरू राहणार आहे. दिनांक २३,आणि २४ एप्रिल कालिदास कला मंदिर मध्ये सकाळी 9 वाजता अविरत कलाहोत्र चा प्रारंभ होणार आहे. ६४ संस्था व ६०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत. सर्व रसिकाची, चाहत्यांची उपस्थिती प्रार्थनीय आहे असे आवाहन कीर्ति कला मंदिर च्या कार्यकर्त्यांनी केले आहे.