नाशिक – कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे ,सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, अतुल पेठे यांसह एकूण सहा जणांना यंदाचे पुरस्कार घोषित झाले आहे. पुरस्कारार्थींना २१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असं ‘गोदावरी गौरव’ पुरस्काराचे स्वरुप आहे.१० मार्च २०२२ रोजी कुसुमाग्रज स्मारकात सायंकाळी ६ वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
यंदाचे मानकरी१) अतुल पेठे (नाट्य) सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, प्रयोगशील कलावंत.२) प्रा. डॉ. हेमचंद्र प्रधान (ज्ञान) आंतराष्ट्रीय ख्यातीप्राप्त सिद्धांतिक भौतिक शास्त्राचे प्राध्यापक.३) डॉ. सुधीर पटवर्धन (चित्र) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार.४) सीताबाई काळू घारे (साहस) अदम्य साहस दाखविणाऱ्या धाडसी महिला.५) पं. सुरेश तळवलकर (संगीत) प्रख्यात तबला वादक, तालयोगी, गुरु.६) राजेश टोपे (लोकसेवा) कोरोनाच्या मोठ्या संकटात संपूर्ण महाराष्ट्राच्या आरोग्याची जबाबदारी पेलणारे कार्यकुशल आरोग्य मंत्री.
साहित्येतर क्षेत्रांसाठी आपआपल्या क्षेत्रात अखिल भारतीय पातळीवर संस्मरणीय कामगिरी करणार्या व देशाची सांस्कृतिक उंची उंचावणार्या ज्येष्ठांना केलेला ”हा कृतज्ञतेचा नमस्कार आहे, पुरस्कार नाही” असे कुसुमाग्रजांनी जाणीवपूर्वक नोंदवले आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी ज्ञान-विज्ञान, चित्रपट-नाटय, क्रीडा-साहस, चित्र-शिल्प, संगीत-नृत्य, व लोकसेवा ह्या क्षेत्रातील व्यक्तींना हा गौरव पुरस्कार दरवर्षाआड देण्यात येतो