मुंबई,दि.१८ ऑक्टोबर २०२३ – ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अखेर मुंबई पोलिसांनी चेन्नई मधून अटक करण्यात आले असल्याची चर्चा असून या बाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे. ललित पाटील याला अटक करण्यात आल्याची माहिती जरी मिळाली असली तरी पोलिसांनी अद्याप या बातमीला दुजोरा दिलेला नाही.
गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील ससून रूग्णालयातून फरार झाला होता. त्यानंतर पुणे पोलीसच नाही तर मुंबई पोलिसही त्याचा शोध घेत होते.ललित पाटील याचा एम डी ड्रग चा कारखाना नाशिकच्या शिंदे परिसरात होता काही दिवसांपूर्वी हा कारखाना मुंबई पोलिसांनी उध्वस्त केला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नई मधून ताब्यात घेतले असून त्याला आज मुंबईत आणण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. साकीनाका पोलिसांनी हि कारवाई केल्याचे समजते आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार पुण्यातून फरार झालेला ललित पाटील गुजरातला गेला.तेथून एका टूर्स अँड ट्राईव्हल ची गाडी रेंट वर घेऊन तिथून तो कर्नाटकात गेला तेथून तो चेन्नईला गेला. पोलीसांच्या ताब्यात असलेल्या एका संशयिताला ललित पाटीलचा फोन आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला त्यानंतर पाटीलला पोलिसांनी अटक केल्याचे समजते आहे. आज पत्रकार परिषद घेऊन मुंबई पोलीस पत्रकारांना माहिती देतील असं समजते आहे.