मुंबई,दि.१८ ऑक्टोबर २०२३ – गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील ससून रूग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी नेत असतांना त्याने मीडिया समोर गौप्यस्फोट केले आहेत.
ललित पाटील चेन्नई वरून श्रीलंकेला पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी अटक केली तपासणी साठी नेत असतांना त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीं समोर सांगितले कि मी ससून हॉस्पिटल मधून पळून गेलो नसून मला पळवले गेले आहे. मी पत्रकारांशी बोलेल कोणाकोणाची हात आहे. हे सर्व मी सांगेल असे ललित पाटीलने सांगितले.
ललित पाटील याचा एम डी ड्रग चा कारखाना नाशिकच्या शिंदे परिसरात होता काही दिवसांपूर्वी हा कारखाना मुंबई पोलिसांनी उध्वस्त केला होता.त्याचा भाऊ भूषण पाटील याला या आधीच अटक केली होती त्यानंतर अखेर आज ललित पाटील ला पोलिसांनी अटक केले थोड्याच वेळात ललित पाटील याला हजर करण्यात आले आहे.त्याच्या बरोबर त्याचे दोन साथीदारानां पण न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
ललित पाटील न्यायालयात अजून कोणते मोठे खुलासे करतो कोणाकोणाचे नावे घेतो या कडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.दरम्यान,पुण्यातून पळाल्यानंतर ललित पाटील नाशिकमध्ये आला होता. काही दिवस तो नाशिकमध्येच होता. तिथून तो गुजरात व त्यानंतर कर्नाटकमध्ये गेल्याचे पुढे येत आहे.नाशिकमध्ये ललित व भूषण या पाटील बंधूंच्या ड्रग्ज कारखान्याचा साकीनाका पोलिसांनी उलगडा केल्यानंतर आता ललितच्या वास्तव्याबाबतची माहिती पुढे येत असल्याने नाशिक पोलिसांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तसेच नाशिकमध्ये तो कुठे लपला होता, त्याला कोणी मदत केली याचाही शोध घेतला जाण्याची शक्यता आहे.आता काही वेळातच थोड्याच वेळात मुंबई पोलीस पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार आहे.