रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळली : १० जणांचा मृत्यू
माळीण आणि तळीयेची पुनरावृत्ती :१०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता
रायगड,दि.२० जुलै २०२३ –मुसळधार पावसाने राज्याला जोरदार तडाखा दिला आहे.मुसळधार पावसामुळेच रायगडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर काल रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या वाडीत ४८ कुटुंब होती तर २४८ लोक राहत होते. यामध्ये १०० हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.दुर्घटनेत आतापर्यंत ८० लोकांना बाहेर काढण्यात रेस्कूय टीमला यश आलं आहे. ७ जणांचा मृत्यू झाला आहे.मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये जाहीर करण्यात आले आहे.जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी पोहचले असून बचावकार्य सुरु आहे.
जवळपास १६ ते १७ घरांवर दरड कोसळ्यामुळे लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले असून NDRFटीमला पाचारण करण्यात आले आहे.पण पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहे. स्थानिक बचाव पथक काम करत आहे. वरती रस्ता नसल्यामुळे कुठलेही वाहन नेण्याची व्यवस्था नाही.आपण बचावकार्याला प्राधान्य देत आहोत. मंत्री गिरीष महाजन वर असून ते कामावर लक्ष ठेवून आहेत,”अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
दुर्घटनेबाबत माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. ७० ते ८० जण अद्याप बेपत्ताच असल्याची माहिती मिळत आहे.घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे.तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण होऊन बसलंय. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
इरशाळवाडी वस्तीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असून जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे… pic.twitter.com/Qjw8m4NhTq— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023
अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू
दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस आणि मोठ्या प्रमाणावर असलेलं धुकं बाधा ठरतंय. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळं बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे.
दोन ते तीन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाही -गिरीश महाजन
“बचावकार्य सुरु असून पाऊस बराच असल्याने त्यामध्ये अडचणी येत आहेत. मी रात्री तीन वाजल्यापासून वरती आहे. माती घरांवर कोसळ्याने ती दबली आहेत. इथे येण्याचा मार्गही कठीण आहे. पाऊस जोरात असल्याने काम करणं शक्यच नाही. आतापर्यंत सहा मृतदेह मिळाले आहे. मातीचा ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढणं फार कठीण काम आहे. या गावाची लोकसंख्या अडीचशे आहे. त्यातील 70 ते 80 लोकांची माहिती मिळाली आहे. बचावलेल्यांचा आकडा किती असेल हे सांगणे कठीण आहे. नातेवाईकांकडे चौकशी सुरु आहे. मृतदेह बाहेर काढणं सुद्धा कठीण आहे. दोन ते तीन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत. कारण मातीचा ढिगारा घरांवर येऊन पडला आहे. पाऊसही थांबत नाहीये. इथे हेलिकॉप्टर येणे देखील शक्य नाही,” अशी धक्कादायक माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री @mieknathshinde हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी… pic.twitter.com/ipXze5yOZu
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023