शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून नवीन अध्यक्षांनी एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे

0

Gayatri Datar, Payal Jadhav
आजचा रंग – पिवळा
छायाचित्र – गायत्री दातार ,पायल जाधव(सौजन्य -कलर्स मराठी)

आजचा रंग – पिवळा
आपल्या ग्रुप चे फोटो जनस्थान ऑनलाईनला पाठवा email -jansthan123@gmail.com अथवा 8329176681 या नंबर वर व्हाट्सअप करा ..फोटो पाठवतांना आपल्या ग्रुप चे नाव आणि आपल्या शहराचा उल्लेख असावा
मुंबई,दि,३ ऑक्टोबर २०२४ – एसटीचे कर्मचारी हे ब्रँड ॲम्बेसेडर व सुंदरी पेक्षा चांगली सेवा प्रवाशांना देत असून शिवनेरी सुंदरीची भुरळ सोडून नवीन अध्यक्षांनी एसटी कर्मचारी व प्रवाशांच्या समस्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या ३०४ व्या सभेत महामंडळाचे नवीन अध्यक्ष भरत गोगावले यांनी शिवनेरी सुंदरीची नेमणूक करण्याची घोषणा केली असून ती परिस्थितीला अनुसरून नाही.आजही कर्मचारी व प्रवाशांच्या अनेक समस्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष देणे गरजेचे असून तसे केल्यास उत्पन्न वाढ होऊन प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा देता येतील,असे बरगे यांनी म्हटले आहे.

शिवनेरी बसची सेवा ही एसटी महामंडळातील अत्यंत चांगली व फायदेशीर सेवा आहे. साधारण 120 इलेक्ट्रिक व डिझेल वरील बस या सेवेत आहेत. एसटीच्या वेगवेगळ्या सेवांच्या तुलनेत या सेवेला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून या सेवेचे सरासरी भारमान हे 80 टक्के इतके आहे. या सेवेत अजून गाड्या वाढविण्याची गरज असून त्याची व्याप्ती निव्वळ पुणे, मुंबई, ठाणे, या पुरती मर्यादित ठेवता राज्यभर वाढवली पाहिजे.आजही मागणीच्या तुलनेत सर्वच सेवेतील गाड्या कमी पडत असून त्यात प्रवाशांना अजून सेवा सुविधा दिल्या पाहिजेत.

एसटी कर्मचारी व अधिकारी अत्यंत हे चांगले काम करीत असून जुन्या झालेल्या गाड्या घेऊन त्यांनी महामंडळ नफ्याच्या जवळ पोहोचविले आहे. ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरीवर खर्च करण्यापेक्षा वाढीव वेतनाचा फरक, महागाई भत्त्याची थकबाकी व वार्षिक वेतनवाढ प्रलंबित थकबाकी द्यावी. त्या मुळे कर्मचाऱ्यांमध्ये चैतन्य वाढून उत्पन्न वाढेल व ते ब्रँड ॲम्बेसेडर व शिवनेरी सुंदरी पेक्षा प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा देतील यात शंका नाही, असेही बरगे यांनी म्हटले आहे.

विमान सेवा ही सलग सेवा असून तिला शक्यतो थांबे नसतात. त्या मुळे त्यांना खान पान देण्यासाठी हवाई सुंदरीची गरज असते.एसटीची कुठलीही सेवा ही थांब्याशिवाय नसून शिवनेरीच्या पुणे,मुंबई या सेवेत सुद्धा गाड्या चहा पाण्यासाठी थांबत असतात. त्यामुळे या गैरलागू योजनेचा फेरविचार करावा अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

दरम्यान,शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी या निर्णयाचा बचाव करताना म्हटले आहे की, “विरोधक विनाकारण या निर्णयावर टीका करत आहेत.आम्ही नवीन बसेसमध्ये गुंतवणूक करत आहोत आणि एसटी महामंडळात सुधारणा करत आहोत. महिलांना रोजगार मिळत असेल, तर काय नुकसान आहे?”

मात्र,शिवसेनेचे यूबीटीचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी या उपक्रमावर टीका करताना,“एसटी बससेवेची विमानांशी तुलना करण्याऐवजी मूलभूत सेवा सुधारण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बसेसच्या स्थितीकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचायचे आहे,हॉटेल सारख्या सेवांचा अनुभव नाही.”या योजनेबाबतीत महत्त्वाची बातमी ही म्हणजे शिवनेरी सुंदरी या योजनेअंतर्गत कुठलाही नवीन भार प्रवाशावर लादला जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आलेली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.