रोटरी नाईन हिल्सतर्फे रविवारी डॉ.महेश करंदीकर यांचे व्याख्यान

0

नाशिक,दि,२ सप्टेंबर २०२३ –रोटरी क्लब ऑफ नाशिक नाईन हिल्स आणि सार्वजनिक वाचनालय,नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार दि.३ सप्टेंबरला औरंगाबादकर सभागृहात सायंकाळी ६.३० वाजता विख्यात मेंदू व मज्जारज्जू विकार तज्ज्ञ डॉ. महेश करंदीकर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे,अशी माहिती क्लबचे अध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, प्रकल्प संयोजक विश्वास शिंपी आणि नरेन्द्र शाळीग्राम यांनी दिली.

२०२३-२४ या वर्षात रोटरीने ‘मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य’ या संकल्पनेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.विविध व्यवसायातील ताण-तणावांचे नियोजन करणे, त्यात सुधारणा घडवून आणणे यावर रोटरीचा भर आहे. ३ सप्टेंबरच्या व्याख्यानात डॉ. महेश करंदीकर त्याच विषयाला अनुसरून ‘मानसिक आरोग्य आणि जीवनशैली’’ यावर मार्गदर्शन करणार आहेत.सर्वांनी त्यांच्या व्याख्यानाचा आवश्य लाभ घ्यावा,असे आवाहनही ब्राम्हणकर, शिंपी आणि शाळीग्राम यांनी केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!