नाशिक शहरात कचरा कुंडीत सापडली बिबट्याची कातडी 

0

नाशिक – शहरातील नाशिक- मुंबई महामार्गावर असलेल्या हॉटेल ज्युपिटरजवळ कचरा कुंडीत  मनपा  सफाई कर्मचाऱ्यांना दुपारी १२ ते १ वाजेच्या सुमारास स्वच्छता करतांना आढळल्या एका गोणीमध्ये बिबट्याची कातडी आढळून आली असून हि कातडी वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. नाशिक शहाराच्या गजबज असलेल्या या भागात हि बिबट्याची कातडी कोणी व कधी टाकली असेल याबाबत आता तर्क वितर्क लावले जात आहे.

दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांनी भर नागरी वस्तीत बिबट्याचे कातडे सापडल्याने रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने घंटागाडी कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला व याबाबत इंदिरानगर पोलिस स्टेशन व वन विभागाला अशा प्रकारचे कातडे ठेवलेली गोणी आढळून आल्याची माहिती दिली. तात्काळ इंदिरा नगर पोलिस स्थानकाचे कर्तव्यावरील कर्मचारीही तेथे हजर झाले व ती कातडी ताब्यात घेतली.

वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे, वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनरक्षक राजेंद्र ठाकरे,उत्तम पाटील, वनमजूर जयनाद गोंगटे आदींच्या पथकाने इंदिरा नगर पोलीस स्थानकात आल्यानंतर त्यांनी हि कातडी ताब्यात घेतली व त्यानंतर पुढील तपासणीसाठी ही कातडी हैद्राबाद येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. वन विभागाच्या  अधिकाऱ्यांनी बिबट्याचे कातड्याची पाहणी केली असता यात बिबट्याचे अवयव नसून फक्त कातडे आढळून आले आहे. तीन ते चार वर्षाच्या बिबट्याचे हे कातडी असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!