किरण घायदार
नाशिक,दि,२९ डिसेंबर २०२४ – राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील डिझेल बसगाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू – एलएनजीमध्ये रूपांतर केलेल्या ५ बसेस पहिल्या टप्प्यात नाशिक विभागात दाखल झाल्या आहेत. ई शिवाई, शिवनेरीनंतर एलएनजी बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या बसेस नाशिक-धुळे,अहिल्यानगर, शनिशिंगणापूर,पाचोरा मार्गावर धावणार आहेत.
डिझेल पेक्षा एलएनजीचे दर कमी असल्याने एसटीच्या संचालनाचा प्रति किमी दर कमी होणार आहे. एलएनजीच्या एका टाकीमध्ये ७०० ते ७५० किमीपर्यंत बस धावू शकते. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबत पैशांचीसुद्धा बचत होणार आहे. सध्या मुंबईत एलएनजीचे दर प्रति किलो ७२ रुपये आहे तर नाशिकमध्ये प्रति किलो ७६ ते ७८ रुपये इतका आहे. भविष्यात एसटी महामंडळ स्वमालकीचा एलएनजी पंप उभारणार आहे एलएनजी गाड्यांचा ताफा वाढविणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
डिझेलऐवजी एलएनजीवर चालणाऱ्या बसमुळे इंधनावर लागणारा खर्च अनेक पटींनी कमी होईल. भविष्यात डिझेलऐवजी एलएनजीसारख्या दह बायो इंधनावर ट्रक आणि बस चालवून इंधनाची बचत यासह प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. टाकी पूर्ण भरलेली असल्यास बस ७००-४५० किमी धावेल. मुंबईत एलएनजीचा दर ७२ रुपये, तर नाशिकमध्ये एलएनजीचा दर ७६ ते ७८ रुपये आहे. डिझेल इंजिनला एलएनजीमध्ये रूपांतरित करण्याची किंमत ५.१५ लाख रुपये इतकी आहे.
५ हजार बसेसचे लवकरच एलएनजीमध्ये रूपांतर
एसटीच्या मालकीच्या १४,००० डिझेल बसपैकी ५,००० बसेस एलएनजीमध्ये बदलल्या जात आहेत. हा प्रकल्प राबवण्यासाठी सरकारकडून ९७० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. डिझेल इंजिनचे एलएनजीमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रति वाहन सुमारे ५.१५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पर्यावरणपुरक सीएनजी इंधनाचा वापर करून वायू प्रदूषण कमी करणे आणि पर्याय म्हणून डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती.
५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
एसटीच्या ताफ्यातील ५ हजार बसचे एलएनजीमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाकडून ९७० कोटींचा निधी मिळणार आहे. डिझेल इंजिनला एलएनजीमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी प्रतिगाडी सुमारे ५.१५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे.
वायुप्रदूषण कमी करणे, डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने एसटीने या महत्त्वाकांक्षी योजनेला प्रारंभ केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.