लोकसभा निवणुकीत ठाकरे गटाला २२ जागा ?: १६ उमेदवारांची यादी निश्चित

१६ उमेदवारांच्या यादीत नाशिकच्या उमेदवाराचा समावेश

0

मुंबई,दि,१८ मार्च २०२४ –लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला २२ जागा मिळणार असून त्यापैकी १६ उमेदवार निश्चित झाले ६ जागांवर वाटाघाटी सुरू असून या सोळा उमेदवारांच्या यादीत नाशिकच्या उमेदवाराचा समावेश करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी चुरशीची लढत होणार आहे महाराष्ट्रातील राजकारणात सध्याची स्थिती पाहता कोण गड राखेल असे प्रश्न जनतेला आहेच, त्यामुळे तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून काम सुरू झालं आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जवळपास ठरले आहे,अशी वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे.यामध्ये विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता विनोद घोसाळकर किंवा अभिषेक घोसाळकर यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांचं नाव समोर आलं आहे.

शिवसेना उबाठा पक्षाची लोकसभा निवडणुकीसाठी यादी निश्चित झाली असून उबाठा पक्षाने एकूण १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत तर द. मध्य मुंबईतून अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. तर संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्या विरोधात सक्षम उमदेवार देण्यासाठी आता महाविकास आघाडी मोठी खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत होती शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरु होती परंतु आत्ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून विजय करंजकर यांचे नाव निश्चित झालं असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते आहे.या बाबत अधिकृत यादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामना मधून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे असे समजते आहे.

१६ जागांवर कोणा कोणाला संधी देण्यात आली ती संभाव्य यादी

१) उत्तर मुंबई- विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर

२) इशान्य मुंबई –संजय दिना पाटील

३) दक्षिण मुंबई-अरविंद सावंत

४) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई

५) छत्रपती संभाजी नगर- चंद्रकांत खैरे

६) बुलढाणा – नरेंद्र खेडकर

७) यवतमाळ – संजय देशमुख

८) उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर

९) परभणी – बंडु जाधव

१०) शिर्डी –भाऊसाहेब वाघचौरे

११) नाशिक- विजय करंजकर

१२) ठाणे – राजन विचारे

१३) रायगड – अनंत गिते

१४) हिंगोली – नागेश अष्टीकर

१५) रत्नागिरी– सिंधुदुर्ग – विनायक राऊत

१६) सांगली – चंद्रहास पाटील

महाराष्ट्रात ७ मे, १३ मे आणि २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. एकूण लोकसभेसाठी सात टप्प्यात मतदान होणार असून याचा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.