मुंबई,दि.४ जून २०२४ – लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा (Lok Sabha Election 2024) निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली असून महायुती आणि महाआघाडी मध्ये काटेकी टक्कर बघायला मिळत आहे,महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश .. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मददार संघातून सुप्रिया सुळे विजयी झाल्या असून अजित पवाराना मोठा धक्क्का बसला आहे. ठाकरे गटाने मुंबईचा बालेकिल्ला राखला असून ठाकरे गटाचे ४ उमेदवार विजयी झाले आहे.
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील कल बघून भाजपाची डोकेदुखी वाढणार की काय असं चित्र निर्माण झाले आहे.
नाशिक मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे आघाडीवर असून दिंडोरीमध्ये विद्यमान खासदार भारती पवार पिछाडीवर असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पवार गटाचे भास्कर भगरे आघाडीवर आहे,
महाराष्ट्रातील पहिला निकाल : कॉंग्रेसचे गोवाल पाडवी विजयी
नाशिक मधून शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी
दिंडोरी मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पवार गटाचे भास्कर भगरे विजयी : भारती पवार पराभूत
धुळे मतदार संघातून कॉंग्रेसच्या शोभा बच्छाव विजयी
सांगलीतून अपक्ष विशाल पाटील विजयी
ठाण्या मधून शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी
नागपूर मधून नितीन गडकरी विजयी
मुंबई उत्तर पूर्व मधून शिंदे गटाचे रवींद्र वाईकर विजयी
अमरावतीतून नवनीत राणा पराभूत
दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई विजयी
रावेर मधून रक्षा खडसे विजयी
बारामती मधून सुप्रिया सुळे विजयी सुनेत्रा पवार यांचा पराभव
पुण्या मधून भाजपाचे मुरलीधर मोहोळ विजयी
लातूर मधून कॉंग्रेस चे शिवाजीराव कालगे विजयी
मावळ मधून शिंदे गटाचे श्रीरंग बारणे विजयी
कल्याणमधून श्रीकांत शिंदे विजयी
रत्नागिरी मधून नारायण राणे विजयी
उत्तर मध्य मुंबईतून कॉंग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी उज्वल निकम पराभूत
दक्षिण मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत विजयी
भाजपचे पियुष गोयल विजयी
भाजपच्या स्मिता वाघ जळगाव मधून विजयी
सातारा मधून भाजपा चे उदयन राजे भोसले विजयी
बीड – बजरंग सोनावणे – शरद पवार गट विजयी
शिर्डी मधून भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) विजयी
ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील विजयी
धाराशिव मधून ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर विजयी
चंद्रपूर मधून प्रतिभा धानोरकर विजयी : सुधीर मुनगट्टीवार पराभूत
शिरुर मधून पवार गटाचे अमोल कोल्हे विजयी
सोलापूर मधून प्रणिती शिंदे (कॉंग्रेस) विजयी
अमरावती मधून भाजपचे अनुप धोत्रे विजयी :
संभाजीनगर मधून संदीपान घुमरे (शिंदे गट) विजयी
अहमदनगर मधून शरद पवार गटाचे निलेश लंके
कोल्हापूर मधून छत्रपती शाहू महाराज विजयी
ताजे निकाल बघण्यासाठी पेज रिफ्रेश करा
भारताचा कल
महाआघाडी – २३१
महायुती – २९४
महाराष्ट्र
महाआघाडी –२९
महायुती –१८
नाशिक (२६ वी फेरी) अधिकृत
राजाभाऊ वाजे –६०३६६५
हेमंत गोडसे –४४०८२९
शांतिगिरी महाराज –४३४५९