राज्यातील पाचव्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

२० मे रोजी मुंबईतील ६ जागांसह राज्यातील १३ जागांसाठी मतदान

0

मुंबई,दि,१८ मे २०२४ –लोकसभा निवडणुकीसाठी सुरु असलेल्या राज्यातील पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. महाराष्ट्रात २० मे रोजी मुंबईतील ६ लोकसभेच्या जागांसह राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मुंबईतील ६ जागांसह राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे या लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात  शिवसेना ठाकरे गट वि. शिंदें गट असा सामना होणार आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.

नाशिक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून राजाभाऊ वाजे विरुद्ध शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

पाचव्या टप्प्यातील प्रचारात मुंबईत महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरेंनी प्रचाराची धुरा सांभाळली. तर महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचा धडाका लावण्यात आला होता. विशेष म्हणजे भाजपकडून महाविकास आघाडीच्या विरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले. राज ठाकरेंनी प्रचार सभा घेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांसाठी २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाकडून २ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत.तर उर्वरित ४ जागांवर उद्धव ठाकरेंचे उमेदवार महायुतीशी दोन हात करणार आहेत. महायुतीमध्ये ३ जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाल्या होत्या. तर उर्वरित तीन जागांवर भाजपने शड्डू ठोकला होता.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.