मुंबई १५ एप्रिल, २०२५ – लर्स मराठीवरील लय आवडतेस तू मला मालिकेत धुमाळ कुटुंबात सध्या समाधानाचे क्षण आहेत कमलच्या खऱ्या किडनॅपरला पकडण्यासाठी सईने दिलेल्या मदतीमुळे सगळ्यांचा तिच्या प्रति असलेला रोष कमी होतो आहे आणि सर्वजण तिच्या या मदतीमुळे खूश आहेत. सरकार आप्पांसाठी घेतलेल्या प्लॉटवर घर बांधण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण करायचं ठरवतो.
दरम्यान, सानिका एका अडचणीत आलेल्या जोडप्याचं भांडण समजुतीने सोडवते, तर आप्पा सरकारकडून वचन घेतात की तो कधीच भांडण किंवा मारामारी करणार नाही. पण सरकारसाठी खरी अडचण तर सानिकाच्या नाराजीमुळेच निर्माण होते. सरकारला सानिकाच्या रागाचं कारण कळत नाही, त्याच्याकडून काही चूक घडली आहे का? हे सुद्धा सानिका सांगायला तयार नाहीये. बायकोच्या मनातलं नवऱ्याने कसं ओळखावं हे कधी नं सुटणारं कोडं आहे आणि त्यामुळे सरकार गोंधळला आहे, तो आता हे कसं सोडवणार ? सरकार सानिकाला मनविण्यसाठी अनेक प्रयत्न करतो पण ते यशस्वी ठरतात का ? सानिका ठामपणे म्हणते “जोवर तुला तुझी चूक समजत नाही, तोवर मी बोलणार नाही.” यामुळे सरकार अधिकच गोंधळतो आणि चिडचिड करतो. आता नक्की काय कारण आहे ? का सानिका चिडली आहे ? हे कळेलच. तेव्हा पहा # लय आवडतेस तू मला सोम ते शनि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.
शेवटी जेव्हा सरकारला सानिकाच्या नाराजीचं खरं कारण कळतं, तेव्हा एक खास संध्याकाळ साजरी केली जाणार आहे पण ते कश्याबद्दल हे लवकरच पहायला मिळणार आहे. सरकार सानिकाला सुंदर सरप्राइज देणार आहे. त्यांच्या आयुष्यातले हे सुखाचे क्षण कायम राहतील कि येणार नवं वळण ? याच आठवड्यात सरकारचं आप्पांसाठी घर बांधण्याचे स्वप्नं तो पूर्ण करू शकेल का ? बाप लेकाच्या नात्यातील संबंध यात सुद्धा नवी आव्हानं येणार आहेत.
सरकार आणि आप्पाच्या नात्यातील नवं आव्हानं घेणार सानिका आणि सरकारच्या प्रेमाची नवीन परीक्षा. ती ते दोघे मिळून कशी पार पडेल? हे जाणून घेणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्कंठावर्धक ठरणार आहे.