खासदार ओमराजे निंबाळकर यांना ‘कार्यक्षम खासदार पुरस्कार’जाहीर

0

नाशिक, दि. १२ मार्च २०२६ : Madhavrao Limaye Memorial Award नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा कै. माधवराव लिमये स्मृतीप्रित्यर्थ ‘कार्यक्षम खासदार पुरस्कार’ यंदा खासदार Omraje Nimbalkar यांना जाहीर करण्यात आला आहे. हा मानाचा पुरस्कार शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नाशिकमधील प.सा.नाट्यमंदिर येथेआयोजित विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण राहुल नार्वेकर(अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र शासन, मुंबई.) यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सार्वजनिक वाचनालय नाशिकचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके भूषवणार आहेत.

सार्वजनिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना गौरविण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वाचनालय नाशिककडून (Madhavrao Limaye Memorial Award)हा पुरस्कार दिला जातो. यंदा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या लोकहिताच्या कामांमुळे आणि संसदीय कार्यातील सक्रियतेमुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.

कार्यक्रमाला शहरातील मान्यवर,साहित्यप्रेमी, वाचनालयाचे सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष वैद्य. विक्रांत जाधव, डॉ. सुनील कुटे, कार्याध्यक्ष संजय करंजकर, प्रमुख सचिव सुरेश गायधनी, सहसचिव प्रा. सोमनाथ मुठाळ, ग्रंथसचिव देवदत्त जोशी, अर्थसचिव गिरीश नातू, नाट्यगृह सचिव जयेश बर्वे, सांस्कृतिक कार्य सचिव जयप्रकाश जातेगावकर, वस्तुसंग्रहालय सचिव अॅड. अभिजित बगदे तसेच कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. धर्माजी बोडके, सौ. प्रेरणा बेळे, प्रशांत जुन्नरे, मंगेश मालपाठक, अॅड. भानुदास शौचे यांनी केले आहे.

तसेच या पुरस्कारासाठी देणगी देणारे डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. शोभाताई नेर्लीकर आणि डॉ. आर्चिस नेर्लीकर यांनीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले आहे.नाशिकच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या या उपक्रमामुळे लोकप्रतिनिधींच्या कार्याचा गौरव होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!