Maharashtra Bandh : महाविकासआघाडीचे आज मूक आंदोलन

0

मुंबई,दि,२४ ऑगस्ट २०२४ –बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्यावतीने आज (२४ ऑगस्ट) रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती मात्र, या महाराष्ट्र बंदच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयात काल (२३ ऑगस्ट) सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट करत राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र बंद करण्याचा अधिकार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. यानंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

न्यायालयाच्या आदेशा नंतर महाविकास आघाडीकडून बंद जरी मागे घेतला असला तरी आज राज्यभरात ठिकठिकाणी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून शांततापूर्वक मूक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाविकासआघाडीचे अनेक नेते सहभागी होणार आहेत. मुंबईतील शिवसेना भवनाजवळ ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आंदोलन करणार आहेत. तर पुण्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे मूक आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासोबत काँग्रेसही राज्यभरात मूक आंदोलन करणार आहे.यावेळी महाविकासआघाडीचे नेते तोंडाला काळी पट्टी बांधून आंदोलन करणार आहेत. तर महाविकासआघाडीच्या आंदोलनाला भाजपकडून प्रत्युत्तर देत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.