महाराष्ट्रात मंत्रिमंडळ फेरबदलाची शक्यता; ८ मंत्र्यांना घरचा रस्ता! कोणत्या गटाला सर्वाधिक धक्का?
कोणत्या गटातील किती मंत्र्यांना धक्का?भाजपमध्ये संभाव्य नव्या चेहऱ्यांना संधी?
📍 मुंबई, २५ जुलै २०२५ – Maharashtra Cabinet Reshuffle News महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या घडामोडी घडत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळात मोठा फेरबदल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. महायुती सरकारमधील आठ वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपचे दोन, शिंदे गटाचे चार आणि अजित पवार गटाचे दोन मंत्री असल्याची माहिती आहे.
⚠️ कोणत्या गटातील किती मंत्र्यांना धक्का?(Maharashtra Cabinet Reshuffle News)
सध्या महायुतीतील काही मंत्र्यांचे वर्तन, वक्तव्य आणि कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर फेरबदल अनिवार्य असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. संभाव्य डच्चू मिळणाऱ्या मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे:
🔸 शिंदे गट:
संजय शिरसाट (सामाजिक न्याय मंत्री) – वादग्रस्त व्हिडीओमुळे अडचणीत
भरत गोगावले
दादा भुसे (शिक्षणमंत्री)
योगेश कदम (गृहराज्यमंत्री) – बारवरील कारवाईमुळे वादात
🔸 अजित पवार गट:
माणिकराव कोकाटे (कृषिमंत्री) – विधिमंडळात मोबाईलवर गेम खेळताना सापडले
नरहरी झिरवळ – कामगिरीबाबत असमाधान
🔸 भाजप:
नितेश राणे (मत्स्यविकास मंत्री) – सातत्याने वादग्रस्त विधानं
जयकुमार गोरे (ग्रामविकास मंत्री)
📌 फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर चर्चा काय?
विधानसभा निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी भाजप-शिवसेना-एनसीपी महायुती सरकारची प्रतिमा टिकवणे ही मोठी गरज आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षमतेवर आधारित निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
१०० दिवसांच्या कार्यकाळात अनेक मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नव्हती. यामुळेच फेरबदल अपरिहार्य झाल्याचे सांगितले जात आहे.
🧨 व्हिडीओ, हनी ट्रॅप आणि आरोप
सध्या अनेक मंत्री वादात सापडले आहेत. काहींचे व्हिडीओ आणि हनी ट्रॅप प्रकरणांशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे.
संजय शिरसाट यांचा पैशांनी भरलेल्या बॅगेसह व्हिडीओ
योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या मालकीच्या बारवर कारवाई
माणिकराव कोकाटे यांचा गेम खेळतानाचा व्हिडीओ
गिरीश महाजन यांचा हनी ट्रॅप आरोपीसोबतचा फोटो
या घटनांमुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असून, सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
🤝 भाजपमध्ये संभाव्य नव्या चेहऱ्यांना संधी?
राजकीय वर्तुळात असेही बोलले जात आहे की, फेरबदलाच्या माध्यमातून काही नाराज आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल. तसेच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते, तर त्यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी अध्यक्षपदी लागण्याची शक्यता आहे.
💬 अजित पवार यांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कृषिमंत्री कोकाटे यांच्याबाबत कारवाईचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, “सोमवार किंवा मंगळवारी मी त्यांची भेट घेईन आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.” त्यांनी हनी ट्रॅप संदर्भातही स्पष्ट भूमिका घेत, “ज्यांच्याकडे पेन ड्राइव्ह किंवा पुरावे आहेत त्यांनी सरकारकडे द्यावेत,” असे म्हटले आहे.