Maharashtra:अखेर मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला ? या तारखेला होणार शपथविधी सोहळा

या फॉर्म्युलाने मंत्रिपदांचे वाटप होणार !

0

मुंबई,दि,२५ नोव्हेंबर २०२४ – महाराष्ट्रात महायुतीच्या जोरदार पुनरागमन नंतर मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेंस कायम आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजप पुन्हा सरप्राईज देणार का ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव चर्चेत असले तरी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती आहे. आर एस एस कडून ही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला असून याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. येत्या २७ किंवा २८ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता वानखेडे स्टेडियम वर महायुतीचा शपथविधी होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

असा असू शकतो फॉर्मुला
देवेंद्र फडणवीस यांच्या कडे अडिचवर्ष मुख्यमंत्री पद त्यानंतर अडीच वर्ष एकनाथ शिंदे आणि अजित पवार पाच वर्ष उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात आहे.त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने कडे काही महत्वाची खाती देण्यात येणार आहेत. गृहमंत्री पद मात्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे.

महायुती २१-१२-१० चा फॉर्म्युला ; अशा प्रकारे मंत्रिपदांचे वाटप होणार!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने दणदणीत विजय नोंदवला. १३२ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांचा पक्ष शिवसेना ५७ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अजित पवार हे त्यांचे काका शरद पवार यांच्या पक्षाच्या चार पट आमदार जिंकण्यात यशस्वी झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या सर्व पक्षांमध्ये मंत्रिमंडळावर एकमत झाले आहे.

२१-१२-१० च्या संभाव्य सूत्रावर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे दिसते.फॉर्म्युल्यानुसार भाजपचे २१,शिवसेनेचे १२आणि राष्ट्रवादीचे १०मंत्री असतील. मंत्रिमंडळाच्या सूत्रावर प्राथमिक बोलणी झाली आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची सर्वाधिक संख्या ४३ असू शकते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!