Monsoon Update:महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार,१४ जूनपासून पाऊस पुन्हा सक्रिय

अनेक जिल्ह्यांना ऑरेंज व रेड अलर्ट ;नागरिकांसाठी सूचना

1

मुंबई, दि. १३ जून २०२५ – Maharashtra Monsoon Alert मान्सूनपूर्व हवामान प्रणालीमुळे राज्याच्या विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या १४ जूनपासून (शनिवार) पावसाचा जोर अधिक वाढणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अती मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

🔺 रेड आणि ऑरेंज अलर्ट – जिल्हानिहाय माहिती:
१३ जून (आज):
रत्नागिरी, सिंधुदुर्ग – रेड अलर्ट
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा – ऑरेंज अलर्ट

१४ जून (शनिवार):(Maharashtra Monsoon Alert)
रायगड, रत्नागिरी – रेड अलर्ट
पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, जालना – ऑरेंज अलर्ट

⚠️ हवामान खात्याचा इशारा:
दक्षिण कोकण व गोवा: ताशी ५०-६० किमी वेगाने वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस.
उत्तर कोकण व मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, विजांचा प्रकोप शक्य.
पुणे जिल्हा: पुढील ३ तासांत गडगडाटी वादळासह पावसाचा इशारा.

🌧️ पुण्यातील स्थिती:

पावसामुळे पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये पाण्याची निचरा व्यवस्था कोलमडल्याने अनेक खोल्यांमध्ये पाणी साचले. ड्रेनेज लाईन बंद झाल्याने परिसरात पाणी साचून तळं निर्माण झाल्यासारखी स्थिती होती. काही वेळ वाहतूकही विस्कळीत झाली.

🛑 नागरिकांसाठी सूचना:
गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका.

विजेच्या गडगडाटादरम्यान झाडांखाली उभं राहणं टाळा.
मोबाईल, वीज यंत्रणा वापरताना खबरदारी घ्या.
पावसाच्या साचलेल्या पाण्यातून वाहतूक करू नये.

✅ महत्वाची माहिती
हवामान खात्यानुसार, मान्सूनने केरळमधून गोव्यापर्यंत मजल मारली असून, पुढील ३ ते ५ दिवसांत तो पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूर्णपणे सज्ज असून, कोणतीही आपत्कालीन माहिती मिळताच १०८ किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] पूर्ण ताकदीनिशी एंट्री घेतली असून, कोकण, मुंबई आणि विदर्भासह घाटमाथ्याच्या […]

Don`t copy text!