राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुंबईत पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन
दि.७ जानेवारी रोजी षण्मुखानंद सभागृहात होणार पदाधिकारी संवाद मेळावा
अजित पवार,प्रफुल्ल पटेल,सुनील तटकरे,छगन भुजबळ राहणार उपस्थित
मुंबई,दि.३ जानेवारी २०२४ –राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.७ जानेवारी २०२३ रोजी षण्मुखानंद सभागृह,मुंबई येथे सायंकाळी ४ वाजता पदाधिकारी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे.
या संवाद मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा मुंबई प्रभारी छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या संवाद मेळाव्यास पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांनी केले आहे.