राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ –कोणाला डिग्री,कोण नापास :देवेंद्र फडणवीस

0

मुंबई | १४ मे २०२५ – Maharashtra politics news आगामी पालिका निवडणुका आणि महायुतीतील संभाव्य भागीदारी यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडली.

🗣️ राज ठाकरे हे एक मुक्त विद्यापीठ – फडणवीसांची उपरोधिक टीका
राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकांवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले:

“राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ आहेत. कोणाला डिग्री मिळेल, कोण नापास होईल हे सांगता येत नाही. लोकसभेत आमच्यासोबत होते, विधानसभेत होते की नाही, माहित नाही. पालिकेत काय होईल तेही सांगता येत नाही.”

🏛️ महायुती ठाम, महापौर आमचाच – फडणवीसांचा विश्वास (Maharashtra politics news)
“मुंबई महापालिका निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढणार. शंभर टक्के महायुतीचाच महापौर बसेल. उद्धव ठाकरेंनी युतीत येण्याचा निर्णय आधीच नाकारला होता,” असे फडणवीस म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “कधी कौतुक, कधी टीका – उद्धव ठाकरेंची भूमिका बदलती आहे. त्यामुळे एकत्र येण्याची शक्यता नाही.”

🔄 तिघांचं सरकार, तिघींचे स्वभाव – शंकर, एहसान, लॉयची उपमा
एकनाथ शिंदे हे शिवसैनिक आहेत, भावनिक आहेत. अजित पवार प्रॅक्टिकल निर्णय घेणारे. आणि मी यांच्यात समतोल राखतो. त्यामुळे आम्ही ‘शंकर एहसान लॉय’ आहोत,” अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली.

⏳ तोडग्याची प्रतीक्षा – निर्णय लवकरच
फडणवीसांनी स्पष्ट केलं की, “तीन पक्षांचं सरकार नैसर्गिक नसल्यामुळे निर्णय प्रक्रियेत वेळ लागतो. काही निर्णयांवर एकमत नसेल तर ते स्थगित ठेवले जातात. तोडगा निघेल हे म्हटलं होतं, पण महिना कोणता हे सांगितलं नव्हतं.”

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!