मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा :नाशिक मध्ये संततधार

0

मुंबई,दि,२६ ऑगस्ट २०२४ – हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज (२६ ऑगस्ट) राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.नाशिक मध्ये रात्रभर संततधार सुरु असून ४१.८ मिमी एवढी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई आणि पालघरमध्येही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये उद्या तुरळक भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील उद्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आली आहे.तर नंदुरबारमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, शहरी भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

रविवारी झालेल्या अतिमुसळधार पावसानंतर नाशिकमध्ये गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ७२२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली. रामकुंडावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहे. दरम्यान सध्या नाशिकच्या होळकर ब्रिज खालून १३००० क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे.

कोणत्या भागासाठी अलर्ट ? 
नाशिक -ऑरेंज
नंदूरबार – ऑरेंज
मुंबई – यलो
पुणे – ऑरेंज
कोल्हापूर -ऑरेंज
सातारा -ऑरेंज
ठाणे  – ऑरेंज
रायगड – ऑरेंज
रत्नागिरी – ऑरेंज
सिंधुदुर्ग – ऑरेंज

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!