मुंबई,दि,७ जुलै २०२४ – राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
राज्यात काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या भागात शेतीच्या कामांना वेग आला असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज राज्यातील हवामान नेमकं कसं असेल, याबाबतची माहिती हवामान विभागाने दिली आहे.गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात एकदाच पावसाने हजेरी लावली आहे. त्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या देखील केल्या आहेत. मात्र, पावसाने पाठ फिरवली अन् शेती पिके संकटात सापडली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार,आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील बहुतांश भागात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
https://x.com/Hosalikar_KS/status/1809809879047008645/photo/1