राज्यातील ‘या’ जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे धक्के 

0

सोलापूर – राज्यातील अनेक भागात पावसाचा धुमाकूळ सुरु असून आज सकाळी राज्यातील काही जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सकाळी ६ वाजून २४ मिनिटांनी ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला. कोयनेच्या भुकंपमापन केंद्रावर ४ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे .

भूकंपमापन केंद्रापासून १३६ किमी अंतरावर भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानीची अद्याप नोंद नाही. याबाबतचा अधिक तपास सध्या केला जात आहे. भूकंपामुळे किती ठिकाणी नुकसान झालं याची अद्याप माहिती मिळालेली नाही.

भूकंपाचे केंद्र कर्नाटकातील विजयपूर असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील गावात भूकंप धक्का जाणवला आहे. भूकंपाचे धक्के बसल्याने काहीसं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. भूकंपाचे धक्के जाणवल्याने काहीशी खळबळ उडाली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.