मुंबई,दि.२ डिसेंबर २०२३ –दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे आणि वेस्टर्न डिस्टर्बनसमुळे राज्यात पुढील २४ तासांत काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.अवकाळी पावसाचं थैमान सुरुच असल्याने बळीराजा मात्र संकटात सापडला आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात आज अकोला,वाशिम,बुलढाणा,अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यासह देशाच्या तापमानावर परिणाम होणार आहे.
हे संभाव्य वादळ देशाच्या दक्षिण भागात धडकणार आहे. पण त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे.चक्रीवादळ मिचॉन्ग सोमवारी पहाटे पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. उत्तर तामिळनाडू आणि शेजारील दक्षिण आंध्र प्रदेशातील किनारपट्टी जिल्हे सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात.
मध्य महाराष्ट्र,विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील २४ तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
त्याचप्रमाणे पुढील चार ते पाच दिवस मुंबई सह राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट झाली असून, पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.राज्यातील विविध भागातही तापमान १५ अंशांच्या खाली गेलं आहे.अवकाळी पावसामुळे राज्याच्या विविध भागात तापमानात घट होईल.
📢3 डिसेंबरला बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ.
नंतर ते दक्षिण आंध्र प्रदेश किनार्याला समांतर जात उत्तरेकडे सरकेल.
नेल्लोर-मछलीपट्टणम दरम्यान 5 डिसेंबर दुपारच्या दरम्यान चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश ओलांडून 80-90 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह होईल. Gusting 100kmph.
: IMD, 1 Dec. pic.twitter.com/A0R73zEdZU— K S Hosalikar (@Hosalikar_KS) December 1, 2023