राज्याच्या अनेक भागात पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता 

मुंबईत पावसाची हजेरी;राज्यात नाशिक,धुळे,जळगाव,नगर,छत्रपती संभाजीनगर सह विदर्भात पावसाची शक्यता 

0

मुंबई,दि. १ मार्च २०२४ –Maharashtra Weather News : राज्यात मार्च महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे. देशातील हवामान बदलांचं सत्र लक्षात घेता राज्यात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त आहे.  हिमालयाच्या पश्चिमेकडे होत असणाऱ्या बदलांमुळं हवामानातही हे बदल होत असून, उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. आज  मुंबईच्या दक्षिण भागातही शुक्रवारी पहाटे पावसाने हजेरी लावली, तर शहरातील उर्वरित भागावर पावसाच्या ढगांचं सावट पाहायला मिळालं. पुढच्या तीन दिवसांसाठी हवामानाची ही स्थिती कायम राहणार असून, व्हीकेंडही हा पाऊसच गाजवणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.पावसासाठी तयार झालेलं हे वातावरण पाहता हवामान विभागाच्या वतीनं काही भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्याच्या काही भागांमध्ये मात्र ढगांची दाटीच पाहायला मिळेल.

आज शुक्रवारी धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर आणि कोकण पट्ट्यामध्येसुद्धा पावसाळी वातावरण आणि मधूनच उन्हाचा दाह जाणवण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठाणे, रायगड, नंदुरबार, पुणे या भागातही जोरदार पावसाची शक्यता असेल. तरजालना, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिमलाही पाऊस झोडपण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात काही भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शनिवारी मात्र पावसाचा अधिकाधिक ओघ विदर्भाकडे पाहायला मिळू शकतो.

पुढच्या तीन दिवसांसाठी हवामानाची ही प्रणाली कायम राहणार असून, व्हीकेंडही हा पाऊसच गाजवणार हे नक्की. पावसासाठी तयार झालेलं हे वातावरण पाहता हवामान विभागाच्या वतीनं काही भागांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, राज्याच्या काही भागांमध्ये मात्र ढगांची दाटीच पाहायला मिळेल.

देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये म्हणजेच काश्मीर, लडाख आणि उत्तराखंडमध्ये १ आणि २ मार्च रोजी पावसासह बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटामुळं संकट ओढावण्याची शक्यता आहे. हवामानात होणारे हे मोठे बदल पाहता सध्या अनेक ठिकाणी प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापन विभागालाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.