चक्रीवादळाचा इशारा :मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणात पावसाचा इशारा 

0

मुंबई,दि,२१ ऑक्टोबर २०२४ – Maharashtra Weather News / मान्सूननं आता महाराष्ट्राचा निरोप घेतला असला तरी  बरसणाऱ्या पावसाच्यासरी अवकाळीच्या असल्याचे सूचित होत आहे. सकाळी गुलाबी थंडी, दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिमणारा पाऊस अशीच परिस्थिती सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यात पुम्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होणार आहे.

विदर्भासह मराठवाड्यात मात्र तापमानात वाढ झाली असून, कोकण पट्ट्यामध्ये मात्र पावसासाठी काहीसं पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील ४८ तासांनंतर वातावरणात बहुतांशी बदल होणार असून,मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणात पावसाच्या तुरळक सरी आणि विजांचा कडकडाट होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच धर्तीवर राज्यात यलो अलर्टही लागू करण्यात आला आहे.

परतीच्या पावसाचा फारसा प्रभाव मुंबई आणि उपनगरांवर दिसत नसल्यामुळं मुंबईच्या कमाल तापमानात काहीशी वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. शहरातील कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३२ आणि २७ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं आहे. येत्या ४८ तासांमध्ये हे तापमान ३४ अंशांवर पोहोचण्याचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात आली
हा रंग देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.