महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट !’या’ शहरांना ऑरेंज अर्लट

0

मुंबई,दि. १२ मे २०२४ – मे महिन्याचा दुसरा आठवड्यातच महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसाचे संकट कोसळे आहे.जीवघेण्या गर्मीपासून काही प्रमाणात नागरीकांना दिलासा मिळाला जरी असला तरी  अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय.हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे.विदर्भातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरक्ष:धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह अनेक भागांमध्ये पावासाचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

अहमदनगर आणि पारनेर या ठिकाणी देखील पाऊस पडला आहे.याशिवाय पुणे,सातारा,नाशिक,अहमदनगर,कोल्हापूर,सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.पश्चिम महाराष्ट्रमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो,

पुढील दोन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना नागपूर प्रदेशीक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय.तर ११ मे ते १५ मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास ३०-४० प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

सातारा जिल्ह्यात १२ मे या तारखेसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नांदेड, लातूर, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी देखील १२ तारेखासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यात जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातील वादळात वीज खांब वाकलेत तर कुठे विजेच्या तारांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झालंय. ही परिस्थिति एप्रिल महिन्यातली असली तरी मे महिन्यात झालेल्या अवकळी पावसाच्या नुकसानाची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.