महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये विजयी झालेले उमेदवार

0

मुंबई,दि. ५ जून २०२४ –देशात ४०० पार तर राज्यात ४५ च्या वर खासदारांचे स्वप्न पाहणाऱ्या महायुतीला जोरदार धक्का बसला आहे. भाजप तर एक अंकी जागेवर आल्याचं दिसून आलं. राज्यात महायुतीला केवळ १७ जागांवर विजय मिळाला असून महाविकास आघाडीने ३० जागांवर मुसंडी मारली आहे.तर काँग्रेस मधून बंड करून अपक्ष म्हणून निवडून आलेले उमेदवाराचा विशाल पाटील यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जागा या काँग्रेसने पटकावल्या असून काँग्रेसच्या या यशामध्ये विदर्भाचा मोठा वाटा असून विदर्भात काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत.

मागच्या निवडणुकीत ४२ जागा मिळवणाऱ्या भाजप-शिवसेना युतीने यंदा ४५ जागा जिंकण्याचं ध्येय ठेवलं होतं. पण यावेळी त्यांना फक्त १७ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. त्यामध्ये भाजपला ९ जागा, शिंदे गटाला ७ जागा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला १ जागा मिळाली आहे.

महाराष्ट्रात पक्षीय बलाबल
महायुती -१७ जागा
भाजपा – ९
शिवसेना (शिंदे गट) ७
राष्ट्रवादी (अजित पवार) १

महाविकास आघाडी
काँग्रेस-१३
शिवसेना (ठाकरे गट) – ९
राष्ट्रवादी (शरद पवार)-८

महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांमध्ये विजयी झालेले उमेदवार 

१) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट
२) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट
३) उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्गर वाईकर शिंदे गट
४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट
५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट
६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट
७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट
८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट
९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट
१०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट
११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट
१२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट
१३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट
१४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट
१५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट
१६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप
१७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस
१८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस
१९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस
२०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस
२१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस
२२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस
२३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप
२४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस
२५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप
२६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस
२७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस
२८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस
२९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप
३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस
३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट
३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट
३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप
३४) बीड – बजरंग सोनावणे – शरद पवार गट
३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट
३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट
३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप
३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट
३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट
४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप
४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप
४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप
४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष
४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार
४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे
४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे
४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस
४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.