महाराष्ट्रात विधान सभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला :एकाच टप्प्यात होणार निवडणूक
'या' तारखेला होणार मतमोजणी :केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती ;आज पासून महाराष्ट्रात आचार संहिता लागू
नवी दिल्ली ,दि, १५ ऑक्टोबर २०२४ – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्रात विधान सभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर ला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे.अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीतील विज्ञान भवनात ही पत्रकार परिषद घेण्यात आली.राज्रायात निवडणूक कार्ज्यायक्तरम जाहीर झाला असून आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
चौदावी विधानसभा २६ नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे.त्यामुळे २६ नोव्हेंबरआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार आहेत तर महाराष्ट्रात १ लाख १८६ मतदान केंद्र त्याच प्रमाणे २९ लाख हे नव मतदार असणार आहेत १ लाख १८६ पोलिंग स्टेशन असणार असून महाराष्ट्रातील जिल्हे ३६ आहेत एकूण मतदार संघ २८८ महाराष्ट्रात २८८ पैकी २३४ जागा या सर्वसाधारण उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ तर २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत.अशी माहिती देण्यात आली.विधानसभेचं बिगुल वाजल्या नंतर आता जागावाटपाकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
असा असणार निवडणूक कार्यक्रम
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे.
नांदेड लोकसभा पोट निवडणुकीचीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली.नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. काँग्रेस खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्युनंतर जागा रिक्त होती. महाराष्ट्राच्या विधानसभेसोबतच मतदान होणार आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार
केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करताच राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली. चौदावी विधानसभा २६ नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबरआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणं आयोगासाठी बंधनकारक आहे. त्यामुळे त्यापूर्वीच निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक होत आहे. त्यासाठी, राज्यात पुरुष मतदार ४. ९५ कोटी आणि स्त्री मतदार ४.६६ कोटी आहेत, थर्ड जेंडर म्हणजेच तृतीयपंथी मतदारांची संख्या ५९९७ असून राज्यातील दिव्यांग मतदार ६.३२ लाख एवढे आहेत. यंदा पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवयुवकांची संख्या म्हणजे नव मतदार १९.४८ लाख एवढे आहेत. राज्यांत महिला मतदारांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून १०.७७ लाख मतदार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलेल्या माहितीनुसार, एकूण ५२७८९ ठिकाणी १००१८६ मतदान केंद्र असणार आहेत. त्यापैकी शहरी भागांत ४२४०४, तर ग्रामीण ५७५८२ मतदान केंद्र असणार आहेत. एका मतदान केंद्रावर सरासरी ९६० मतदार मतदान करतील.
निवडणूक आयोगाच्यावतीनं सुविधा पोर्टल नावानं अॅप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरू असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, ९० मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. राज्यात पहिल्यांदाच सहा मोठे पक्ष निवडणुकीला सामोरं जाणार आहेत, यात प्रामुख्यानं महायुती आणि महाविकास आघाडीत रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.