महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन

0

कोल्हापुर,दि.२ मे २०२३ – सामाजिक-राजकीय कार्यकर्ते  महात्मा गांधी यांचे नातू आणि  लेखक अरुण गांधी यांचे कोल्हापुरात निधन झाले आहे. ते ८९ वर्षाचे होते. सामाजिक-राजकीय कार्यकर्ते असलेले अरुण गांधी यांच्या पार्थिवावर आज कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. तुषार गांधी हे कोल्हापूरकडे रवाना झाले आहेत.आज कोल्हापुरातच वडिलांचा अंत्यसंस्कार होणार असल्याचे तुषार गांधी यांनी सांगितले.

अरुण गांधी यांचे गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापुरात वास्तव्य होते. अरुण गांधी हे मणिलाल गांधी यांचे पुत्र आहेत. १४ एप्रिल १९३४ रोजी डर्बनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते त्यांचे आजोबा महात्मा गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवत सामाजिक कार्यात सक्रिय होते.

अरुण गांधी यांचे द गिफ्ट ऑफ अँगर: अॅंड अदर लेसन्स ते ८९ वर्षाचे फ्रॉम माय ग्रन्डफादर महात्मा गांधी हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अरूण गांधी हे काही वर्षापूर्वी अमेरिकेत वास्तव्यास होते. महात्मा गांधीप्रमाणे ते अहिंसेच्या मार्गाचे पालन करत असे. यासाठी त्यांनी क्रिश्चियन ब्रदर्स युनिव्हर्सिटीमध्ये अहिंसेशी संबधित एक संस्था स्थापन केली होती.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.