नाशिक- राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली. इतर नेत्यांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचे भाजपातील नेते सांगत आहे. सूडबुद्धीने होत असलेल्या कारवाई विरोधात महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र येत द्वारका सर्कल येथे तीव्र स्वरूपाचे निदर्शने करण्यात आली. निदर्शनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली. “एक नवाब, सौ जबाब” ,“मोदी सरकार हमसे डरती, इडी को आगे करती है” “ना डरेंगे, ना झुकेंगे” अशा तुफान घोषणाबाजीने परिसर दणाणला होता.
यावेळी माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार पंकज भुजबळ, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शरद आहेर, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, अर्जुन टिळे, कोंडाजीमामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधुणे, नगरसेवक गजानन शेलार, वत्सला खैरे, समीना मेमन, सुषमा पगारे, जगदीश पवार, अंबादास खैरे, कविता कर्डक, बाळासाहेब कर्डक, संजय खैरनार आदि उपस्थित होते.
महाविकास आघाडी पक्षातील नेत्यांवर केंद्र सरकारच्या सुडामुळे जाणीवपूर्वक छापा मारून कारवाई करण्यात येत आहे. राज्यात आणखी मोठी कारवाई होऊन अनेक नेते तुरुंगात जातील व राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकणार नाही असा इशारा वारंवार भाजपातील नेत्यांकडून देण्यात येत आहे. महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी मोदी सरकार सुडाचे राजकारण करत असून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे.
नवाब मलिक यांनी अंमलबजावणी संचालनालयातील अधिकाऱ्यांच्या चौकशीला पूर्णपणे सहयोग देऊन सुद्धा अंडरवर्ल्डशी संबंध व मनी लॉंड्रिग या कथित आरोपाखाली अटक केली. शिवसेना नेत्यांच्या घरी इन्कमटॅक्स व इडीच्या माध्यमातून छापा टाकून घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कारवाईचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमट असून शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नेत्यांनी एकत्र येत द्वारका सर्कल येथे जोरदार निदर्शने केली.
यावेळी महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, निवृत्ती अरिंगळे, समाधान जेजुरकर, माजी नगरसेवक संजय चव्हाण, सलीम शेख, धनंजय निकाळे, बबलू खैरे, आसिफ जानोरीकर, चंदू साडे, सुरेखा निमसे, मुजाहिद शेख, शंकर मोकळ, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, जीवन रायते, औसफ हाश्मी, नईम शेख, अनिल जोंधळे, नाना पवार, साजिद मुल्तानी, पूजा अहिरे, अल्ताफ पठाण, इमरान पठाण, नदीम शेख, नियामत शेख, सोनू कागडा, मुकेश शेवाळे, योगेश निसाळ, निलेश जगताप, गौतम आंभोरे, स्वाती बिडला, मीनाक्षी काकळीज, रंजना गांगुर्डे, सरिता पगारे, बाळा निगळ, सागर बेदरकर, विशाल डोखे, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, संतोष भुजबळ, निलेश सानप, डॉ.संदीप चव्हाण, विक्रांत डहाळे, सुनिल घुगे, अक्षय पाटील, विशाल माळेकर, गणेश खोडे, नाना साबळे, सज्जन कलासरे, आकाश कोकाटे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.