मोठी दुर्घटना :लुधियानामध्ये गॅस गळती ९ जणांचा मृत्यू : ११ जणांची प्रकृती चिंताजनक

(व्हिडीओ पहा )

0

लुधियाना,दि. ३० एप्रिल २०२३- पंजाबमधील लुधियाना येथील गियासपुरा येथे गॅस गळती झाल्याने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच ११ जणांची प्रकृती बिघडली आहे.या सर्वाना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर येथील संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. बचाव पथक प्रत्येक घराची तपासणी करत आहेत.

मृतांमध्ये चार मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरांच्या छताचीही ड्रोनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. तसंच डॉक्टर आणि रुग्णवाहिका यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे. गॅस गळतीमुळे आणखी नुकसान टाळण्यासाठी पोलिसांनी आजूबाजूचा ३०० मीटरचा परिसर रिकामा केला आहे.

यासोबतच गॅस गळती थांबवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी पोहोचलेले पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार एका किराणा दुकानातून गॅस गळती झाली असल्याचे समजते आहे. ही कशी झाली. हा गॅस कोणता होता, हे तपासानंतरच कळेल. मात्र, अमोनिया गॅसची गळती झाल्याचा संशय आहे.

ज्या दुकानातून गॅसची गळती झाली त्या दुकानचालकाच्या संपूर्ण कुटुंबालाही आपला जीव गमवावा लागला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील आमदार राजिंदर कौर छिनाही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. गॅस गळती प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जीव वाचवण्याचे काम सुरू आहे. पोलीस कारखान्याच्या मालकाचा शोध घेत आहेत. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार त्यांचे लक्ष लोकांना बाहेर काढण्यावर आहे. प्रत्येक घराची तपासणी केली जात आहे.

(व्हिडीओ पहा )

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.