लडाखमध्ये मोठी दुर्घटना :लष्कराचे वाहन दरीत कोसळले,९ जवान शहीद

0

लडाख,दि.१९ ऑगस्ट २०२३-लडाखमधून एक वाईट बातमी येत आहे. लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील लेह जिल्ह्यात कायरी भागात शनिवारी संध्याकाळी लष्काराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ९ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. त्याचबरोबर अनेक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लडाखच्या संरक्षण अधिकाऱ्याने याला दुजोरा दिला आहे.दक्षिण लडाखमधील न्योमाच्या केरे येथे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातग्रस्त लष्कराच्या ट्रकमध्ये २ जेसीओ आणि ७ जवान होते.एकूण ३४ कर्मचार्‍यांसह एक यूएसव्ही,ट्रक आणि अॅम्ब्युलन्ससह ३ वाहनांची ही रेकी करणारे पथक असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, संध्याकाळी 5.45 च्या सुमारास कियारीच्या 7 किलोमीटर आधी लष्कराचे वाहन दरीत घसरले आणि थेट खड्ड्यात पडले. अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे वाहन करू गॅरिसन येथून लेहजवळील कियारीकडे जात होते. शहीद झालेल्या 9 जवानांमध्ये 2 JCO आणि 7 सैनिकांचा समावेश आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला असून लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराचे जवान शहीद झाल्यामुळे दु:ख झाल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी आमच्या देशासाठी केलेली सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लष्करी जवानांना फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!