GST विभागाची मोठी कारवाई : भिंतीत १० कोटींची रोकड आणि १९ किलो चांदीच्या विटा सापडल्या

0

मुंबई – राज्य जीएसटी विभागाने मुंबईतील झवेरी बाजार परिसरात मोठी कारवाई केली आहे.या कारवाईत जव्हेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलियन या कंपनीच्या छोट्या जागेतील भिंतीत तब्बल ९ कोटी ७८ लाखांची रोकड आणि १३ लाख रुपयांच्या १९ किलो चांदीच्या विटा सापडल्या. राज्य जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात हे घबाड सापडले. कंपनीची उलाढाल वर्ष २०१९ ते २०२२ पर्यंत संशयास्पदरीत्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले.

मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष २०१९-२० मध्ये २२.८३ कोटी रुपयांवरुन वर्ष २०२०-२१ मध्ये ६५२ कोटी तर वर्ष २०२१-२२ मध्ये १७६४ कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या विश्लेषणात लक्षात आले. त्यानंतर जीएसटी विभागाने टाकलेल्या छाप्यात कंपनीच्या अनेक शाखांची नोंदणी आढळून आली नाही. कंपनीच्या ३५ चौरस मीटरच्या एका छोट्या जागेत जीएसटी विभागाला भिंतीत लपवून ठेवलेली ९ कोटी ७८ लाखांची रोकड आणि १९ किलो वजनाच्या (१३ लाख रुपये किमतीच्या) चांदीच्या विटा आढळून आल्या.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.