लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन

0

नाशिक – लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे त्यांना सांगीतिक मानवंदना देण्यात येणार आहे.

आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आंबेडकरी चळवळीतील महाकवी कर्डक यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या ‘वादळवारा एक सांस्कृतिक जलसा’ या अभिनव कार्यक्रमाचे नाशिकच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहात मंगळवार, दि. १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध गायक, गीतकार आणि संगीतकार विष्णू शिंदे आणि संच गायन सादर करणार आहेत. कोवीड-१९ विषाणू प्रादूर्भावाच्या संदर्भातील शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला असून, या कार्यक्रमाचे दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई’ या फेसबुक पेज आणि यूट्यूब वाहिनी वरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे अवाहन संचालक,सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!