मनमाड परिसर हादरला : गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

पुणे-इंदौर महामार्गावरील वाहतूक २ किलोमीटर अंतरावर रोखून धरली

0

नाशिक,८ ऑक्टोबर २०२२ – नाशिक जिल्ह्यात मागील काही तासांपासून दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. आज पहाटे शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुपारी सप्तशृंगी गडावर एस.टी बसला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर गॅस सिलेंडर घेऊन जाणारा बुलेट ट्रक उलटून भीषण आग लागल्याची घटना शनिवारी (दि.८) दुपारच्या सुमारास मनमाडपासून जवळच पुणे-इंदौर महामार्गावर घडली आहे.

ट्रकला आग लागल्यानंतर सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक २ किलोमीटर अंतरावरच रोखून धरण्यात आली आहे. ट्रकमध्ये गॅस ने भरलेले सुमारे २०० सिलेंडर असल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र सिलेंडरचे स्फोट होत असल्यामुळे तेथे जाण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.या स्फोटांच्या आवाजांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे.

व्हिडीओ पहा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.