नवी दिल्ली ,दि,२६ डिसेंबर २०२४ – माजी पंतप्रधान,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन झाले आहे.ते ९२ वर्षांचे होते.आज गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातअतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.मागील अनेक काळापासून ते आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करत होते.याआधी त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारही सुरू केले, मात्र सिंह यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉ.मनमोहन सिंह यांनी सलग दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले.त्यांनी २००४ ते २०१४ दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारचे नेतृत्व केले. त्याआधी पीव्ही नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांनी १९९१-९६ या काळात अर्थमंत्री म्हणूनही काम केले
नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात एलपीजी भारताने उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण धोरण स्वीकारले.या सुधारणांचे प्रमुख शिल्पकार म्हणून मनमोहन सिंह यांना श्रेय दिले जाते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची ओळख अर्थतज्ज्ञ म्हणून देशाला झाली.
Former Prime Minister Manmohan Singh aged 92 passed away at AIIMS Delhi after he was admitted here for treatment pic.twitter.com/OTbJzbXlkv
— ANI (@ANI) December 26, 2024