कडवट शिवसैनिक हरपला:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

0

मुंबई,दि,२३ फेब्रुवारी २०२४ –बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक लोकसभेचे माजी सभापती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज पहाटे ह्रदयविकाराने निधन झाले.वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री ३ वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्यानं हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी सक्रीय राजकारणापासून दूर होते. काल सायंकाळी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केले होते.

त्यांचे पार्थिव आज सकाळी ११ ते २ या वेळात माटुंगरोड येथील त्यांच्या राहत्याघरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.दुपारी २ नंतर शिवाजीपार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान मनोहर जोशींच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व नियोजित दौरे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर होते. मनोहर जोशींच्या निधनाची बातमी समजताच त्यांनी आपला नियोजित दौरा रद्द केला. ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मनोहर जोशी हे मूळचे बीडचे.चा जन्म २ डिसेंबर १९३७ मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. १९९५ साली राज्यात ज्यावेळी युतीची सत्ता आली त्यावेळी मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री बनले.

मनोहर जोशींच्या निधनावर राज ठाकरेंची भावनिक प्रतिक्रिया

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.