मोठी बातमी! मनोज जरांगेंची मोठी घोषणा, सरकारचं टेन्शन वाढणार

0

मुंबई, दि. २९ ऑगस्ट २०२५ Manoj Jarange Mumbai Morcha मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला राज्य सरकारने आणखी एका दिवसाची मुदतवाढ दिली आहे. मात्र, या निर्णयानंतर जरांगे यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे सरकारची चिंता अधिक वाढली आहे.

आंदोलनाची तीव्रता वाढणार(Manoj Jarange Mumbai Morcha)

जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “एका-एका दिवसाची मुदतवाढ देऊन काहीही उपयोग नाही. सरकारने आमच्या मागण्यांचा निर्णय घ्यायलाच हवा. उशीर केला तर मराठा समाज मुंबईकडे येत राहील.” त्यांनी मंगळवार आणि बुधवारनंतर आणखी मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईत दाखल होईल, असं सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, आरक्षणाला विलंब झाला तर शेतकरी, कामगार, तरुण आपलं दैनंदिन काम सोडून आंदोलनासाठी मुंबईकडे येतील. “तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसतील. हा लढा थांबणार नाही,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.

सात ते आठ टप्प्यांचा लढा

जरांगे यांनी आंदोलनाचं हे फक्त सुरुवातीचं पाऊल असल्याचं स्पष्ट केलं. “या आंदोलनाचे एकूण सात ते आठ टप्पे आहेत. आम्हाला माहित होतं की मुंबईत अडचणी निर्माण होतील म्हणूनच सुरुवातीला मर्यादित संख्येने आलो. पण आता लोक मोठ्या प्रमाणावर येतील,” असं ते म्हणाले.

तुरुंगातही उपोषण सुरूच

सरकारने कठोर पवित्रा घेतल्यास मागे हटणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. “तुम्ही मला तुरुंगात टाका, तरी मी उपोषण सुरू ठेवेन. मला गोळ्या घातल्या तरी झेलणार आहे. पण मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी आंदोलन सोडणार नाही,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

सरकारसमोर मोठं आव्हान

आझाद मैदानासोबत सीएसएमटी आणि चर्चगेट परिसरातही आंदोलकांचा तळ दिसू लागलाय. मुसळधार पावसामुळे अडचणी वाढल्या असल्या तरी आंदोलकांचा उत्साह कमी झालेला नाही. जरांगे यांच्या नव्या घोषणेमुळे राज्य सरकारसमोर निर्णायक आव्हान उभं राहिलं आहे. आता सरकार आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!