जालना,दि,२० ऑक्टोबर २०२४ – मागील दीड वर्षांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षण हा मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच संताप व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक पार पडली. बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे .मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणाच्या आख्याड्यात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी आज मराठा समाजाची निवडणूकीमध्ये उमेदवार उभे करायचे की नाही याबाबत बैठक घेतली. जालन्यामध्ये मराठा समाजाला बोलावून उमेदवार उभे करायचे की उमेदवार पाडायचे असा निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांसोबत भेटी घेतल्या. तयारीचा आढावा घेत जरांगे पाटील यांनी अर्जदारांसोबत संवाद साधला. त्यानंतर आता विधानसभेमध्ये उतरायचेव हे निश्चित केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, जिथं निवडून येतील तिथे उमेदवार उभे करणार आहे. एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, आपल्या विचारधारेशी असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचे मत घेत निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. जरांगे पाटील म्हणाले की, तुम्ही अर्ज भरा. २९ तारखेला सांगू कोणाचा अर्ज मागे घ्यायचा. जिथे आपल्या विचारांचा उमेदवार असेल त्यांना पाठिंबा द्यायचा. समीकरण जुळलं नाही तर निवडणुकीतून माघार घ्यायची. मी सांगेन तेव्हा त्या मतदारसंघातून अर्ज मागे घ्यायचा. नाही घेतला तर मी तिसऱ्याला पाडा असं सांगेन, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
ते पुढे म्हणाले जिथे आपण उभा करणार नाही तिथे जो उमेदवार ५०० रुपयाच्या बॉण्डवर आपल्याला समर्थन देईल त्या उमेदवाराला मतदान द्यावे, त्याला आपण निवडून आणायचे बाकीचे सर्व पाडायचे, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मी या समाजाला माय बाप मानलं आहे. ज्या टोकाला जायची इच्छा नसतांना त्या टोकाला जायची वेळ आली. हा संघर्ष राजकारणासाठी नव्हताच. गरजवंत मराठ्यांना राजकारणाची गरज नाही. राजकारणासाठी आमचा संघर्ष नाही. कधी काळी मुलांसाठी आम्ही उठाव केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस हवालदार आहेत. आपल्याला सत्ता परिवर्तन करायचे आहे, धर्मपरिवर्तन नाही. मी शिवरायांचे हिंदुत्व मानतो. मराठ्यांना माझं आव्हान आहे की, कोणाचे ऐकून कोणाशी भांडायचे नाही. इंग्रज तरी बाहेरून आले होते. फडणवीस इथलेच आहेत. ते जगातील सर्वात क्रूर माणूस आहेत. शिंदे समितीला ८ हजार पुरावे सापडले, १४ महिने त्त्यांनी मागणी पूर्ण केली नाही. भाजपचा काय दोष आहे? चालवणारा माकड चांगलं नाही, भाजपमध्ये काही चांगले लोक आहेत. भाजपचा दोष नाही, इथून मागे काय ते आपले शत्रू होते का ? असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.
आज नवरात्रीची आठवी माळ आज सप्तमी आणि अष्टमी एकाच दिवशी येणार आहे. आजचा रंग गुलाबी मानसशास्त्रीय दृष्ट्या, हा सकारात्मकतेचा, आशेचा, उबदार सेवा भावनेचा रंग आहे…. जीवनातं आश्वासन देणारा, आरोग्यदायी मानला जाणारा, सगळं काही ठिक होईल असा आशादर्शक आणि म्हणून PINK Cancer Care Organisation ची आश्वासक गुलाबी रिबीन….निसर्ग इंद्रधनुष्यासारखा आहे. रंग आपल्या भावना दर्शवतात. प्रत्येक रंगाचा सजीवांच्या मनाशी आणि शरीराशी खोल संबंध असतो, जसे लाल रंग ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे. गुलाबी रंगाला जीवनात खूप महत्त्व आहे, हा रंग सौभाग्याचाही सूचक मानला जातो. आज आम्ही तुम्हाला ज्योतिष शास्त्रानुसार या रंगाचे फायदे सांगणार आहोत.