जालना,दि,४ नोव्हेंबर २०२४ –आपल्या आता निवडणूक नसून ह्याला पाडा त्याला पाडा हे राजकारण आता आपल्याला करायचे नाही.विधान सभा निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी सर्वानी आपले अर्ज मागे घ्यावे असे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केले आहे. मित्र पक्षांची यादी आली नसल्याने हि आपण आता माघार घेत असून आपण कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही असं हि त्यांनी सांगितले अंतरवाली सराटीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
हि माघार नसून हा गनिमी कावा आहे असे हि ते म्हणाले येत्या २३ नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होत आहे. निवडणुकीत अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच काही संघटनादेखील यंदा आपले उमेदवार रिंगणात उतरवत असून आता राजकारणात न पडता आपले आंदोलन सुरूच ठेवणार आहे.