मुंबई,१२ ऑक्टोबर २०२२ – झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे ‘झी मराठी अॅवॉर्ड्स’. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला.
यंदा नवा गडी नवं राज्य, माझी तुझी रेशीमगाठ, अप्पी आमची कलेक्टर, दार उघड बये, तू चाल पुढं, सातव्या मुलीची सातवी मुलगी, तू तेव्हा तशी या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे. ह्या वर्षी झी मराठी अवॉर्ड्ससाठी थीम प्रमाणे सगळ्या मालिकांना रंग दिले गेले आहेत.
वेध भविष्याचे – पंधरा रंग , होम मिनिस्टर – सोनेरी रंग , डान्स महाराष्ट्र डान्स – गुलाबी रंग , बस बाई बस – तपकिरी रंग , चला हवा येऊ द्या – वाइन रंग , माझी तुझी रेशीम गाठ – हिरवा रंग, अप्पी आमची कलेक्टर – नेव्ही ब्लू , तू चाल पुढे – केसरी रंग , तू तेव्हा तशी – जांभळा रंग, दार उघड बाय – पिवळा, नवा गाडी नवा राज्य – तील ब्लू आणि सातव्या मुलीची सातवी मुलगी – लाल रंग.
आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण ? ह्यासाठी पाहायला विसरू नका झी मराठी अवॉर्ड शनिवार १५ ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर.