दमदार सेकंड इनिंग: ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत उत्तरार्ध स्पर्धेची अंतिम फेरी २७ मार्चला 

उत्तरार्ध एकांकिका स्पर्धेत ५० च्या पुढच्या कलाकारांची उत्तम सादरीकरण

0

ठाणे ,दि २४ मार्च २०२५ – १५ आणि १६ मार्च २०२५ असे दोन दिवस ठाण्यात एक खास एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा यांच्या सहकार्याने मोरया– इव्हेंटस अँड एंटरटेनमेंटने उत्तरार्ध एकांकिका स्पर्धाचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्यात सहभागी संघ– कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक हे वय वर्ष ५० व त्यापुढचे होते.जागतिक रंगभूमी दिनाच्या औचित्याने येत्या  २७ मार्च २०२५ रोजी, ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर मुख्य नाट्यगृहात पार पडेल. सकाळी १२ वाजल्यापासून निवड झालेले ४ संघ सादरीकरण करणार आहेत.

सॉफ्ट कॉर्नर चे एम. डी. व सी. इ. ओ. दिलीप कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर सर, प्रमुख कार्यवाह नरेंद्र बेडेकर सर, इतर पदाधिकारी तसेच ह्या अनोख्या स्पर्धेचे संकल्पना सूचक श्री. रवी मिश्रा आणि मोरया इव्हेंटस अँड एंटरटेनमेंट चे प्रफुल्ल गायकवाड, कल्पिता पावसकर, शिशिर कोण्णुर ह्यांच्या उपस्थितीत प्राथमिक फेरीचा उद्घाटन सोहळा पार पडला. प्राथमिक फेरीसाठी स्वप्निल जाधव (लेखक व दिग्दर्शक) आणि दीप्ती भागवत (अभिनेत्री, निवेदिका आणि गायिका) हे परीक्षक होते. त्यांनी सगळ्या स्पर्धकांचे मनापासून मनापासून कौतुक केले. वयाची पन्नाशी उलटल्यानंतर राहून गेलेल्या, किंवा जबाबदाऱ्यांमुळे मागे ठेवलेल्या इच्छा आणि कलागुणांना पुन्हा एकदा नव्याने वाव देता यावा पण तरुणांच्या जोश आणि उत्साहात कुठे मागे पडतोय असही होऊ नये म्हणून खास ह्या वयोगटासाठी आयोजित केलेली ही स्पर्धा आणि त्याला नवीन संहिता, उत्तम अभिनय ह्याद्वारे मिळालेला प्रतिसाद ह्याच दोन्ही परीक्षकांनी तोंडभरून कौतुक केले आणि सहभागी संघाना प्रोत्साहन दिले.

“तरुण वयात राहुन गेलेल्या काही गोष्टी करण्यासाठी हे एकाअर्थी सेकंड इनिंगच आहे, मी स्वतः ह्या पिढीचा आहे. आजची तरुण पिढी म्हणजे टीम मोरया एक सुंदर कल्पना घेऊन आली ज्याला पाठिंबा द्यावा हे मलाही वाटलं. ५० च्या वरचे हे कलाकार, ज्याप्रकारे लेखन, दिग्दर्शन, अभिनय करतात ते बघण्यासारख आहे. मोरया इव्हेंटस अँड एंटरटेनमेंट च्या तरुण, उत्साही टीमने या वयोगटासाठी सुरू केलेला हा एक स्तुत्य उपक्रम आहे. अंतिम फेरीत इतर स्पर्धांपेक्षा नक्की काहीतरी वेगळं बघायला मिळेल” असं म्हणत अंतिम फेरीसाठी सगळ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन सॉफ्ट कॉर्नरचे दिलीप कुलकर्णी ह्यांनी केले.

सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत उत्तरार्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ‘सांजसावल्या – माय स्टेज, पुणे’, ‘पन्नाशीची ऐसी तैसी – सुप्रभा चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’, ‘वन सेकंड्स लाइफ – ब्रोकन कॅमेरा, मुंबई’, ‘तिन्ही सांजा – ठाणेआर्ट गिल्ड, ठाणे’ या चार एकांकिकांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी, जागतिक रंगभूमी दिनाच्या औचित्याने २७ मार्च २०२५ रोजी, ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर मुख्य नाट्यगृहात पार पडेल. सकाळी १२ वाजल्यापासून निवड झालेले ४ संघ त्यांचे सादरीकरण करतील. अंतिम फेरीसाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!