आजचे राशिभविष्य शुक्रवार,६ मार्च २०२६ 

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
फाल्गुन कृष्ण तृतीया / चतुर्थी. नाम संवत्सर.
राहुकाळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे.
चंद्रनक्षत्र – हस्त / (सकाळी ९.३० नंतर) चित्रा.
आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या / (रात्री १०.१९ नंतर) तुळ.(गंड, वृद्धी योग आणि विष्टी करण शांती करून घेणे)
आज संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय – मुंबई ९.१९,
नाशिक ९.१६

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) दिवसाची सुरुवात थोडी संमिश्र राहील. मात्र संध्याकाळनंतर परिस्थिती अनुकूल होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसायात नवीन संधी मिळतील. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. संध्याकाळनंतर लाभदायक घटना घडतील. घरात आनंदाचे वातावरण राहील.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. संध्याकाळनंतर शुभ वार्ता मिळेल.
कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) मनातील चिंता कमी होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य लाभेल. काही महत्त्वाची कामे पूर्ण होतील. प्रवासाचे योग संभवतात.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) कार्यक्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संध्याकाळनंतर मन प्रसन्न राहील. नवीन योजना आखाल.
कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. कामात यश मिळेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मात्र बोलताना संयम ठेवा.
तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत येईल. त्यामुळे आनंददायी घटना घडतील. मित्रमंडळींची भेट होईल. मानसिक समाधान मिळेल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) दिवस संमिश्र राहील. काही कामे विलंबाने पूर्ण होतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळनंतर परिस्थिती सुधारेल.
धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मित्रांचे सहकार्य मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. नवीन संपर्कातून फायदा होईल. मन उत्साही राहील.
मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) नोकरीत चांगल्या संधी मिळतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. प्रवासाचे योग संभवतात.
कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) नवम स्थानातील चंद्र भाग्यवृद्धी करेल. धार्मिक कार्यात मन लागेल. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. संध्याकाळनंतर शुभ घटना घडतील.
मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) दिवस थोडा सावधगिरीचा आहे. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. संध्याकाळनंतर मानसिक समाधान मिळेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!