आजचे राशिभविष्य गुरूवार,११ सप्टेंबर २०२५

११ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)

भाद्रपद कृष्ण चतुर्थी/पंचमी. विश्वावसुनाम संवत्सर. शके १९४७, संवत २०८१.

राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.००

आज चांगला दिवस आहे” “भरणी श्राद्ध” घबाड दुपारी १२.४६ पर्यंत.

चंद्र नक्षत्र – अश्विनी/ (दुपारी १.५८ नंतर) भरणी.

आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष. (ध्रुव योग शांती)

११ सप्टेंबर रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-(Marathi Rashi Bhavishya)

तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक आणि काहीसा स्वार्थी दृष्टीकोन असतो. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला जुगार किंवा कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू पाहणी शांत असतात मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्

व्यवसाय:– लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.

शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.

शुभ रंग:- पांढरा, निळा, पिवळा.

शुभ रत्न:- मोती आणि हिरा.

(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल शनी तुम्हाला नवीन संधी देईन. स्वप्ने पूर्ण होतील. वारसा संपत्ती बाबत अचानक काहीतरी चंगली बातमी येईल. मात्र घरगुती वादविवाद टाळा. यंत्र हाताळताना काळजी घ्या.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. प्रलोभने टाळा. व्यसने नकोत. खर्चावर नियंत्रण ठेवा. संभ्रमात टाकणारे ग्रहमान आहे. योग्य सल्ला घेतल्याशिवाय पैसे गुंतवू नका.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळतील. प्रवास घडतील. तुमच्या मनाचा चांगुलपणा तुमचे काम सोपे करेन. सहयोगी व्यक्तींचे उत्तम सहकार्य लाभेल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दशम चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. तरीही मन उत्साही राहील. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. अधिकाराचा गैरवापर नको. नोकरीच्या ठिकाणी महिलांचे उत्तम सहकार्य लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील अडचणी दूर होतील. राशीस्वामी सध्या प्रसन्न आहेत. तुमच्या मनासारख्या घटना घडतील. नेतृत्व कराल. खर्च मात्र वाढतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. काही बाबतीत प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. आरोग्य सांभाळा. तुमच्या स्वभावात काहीशी कठोरता जाणवेल. छोट्या छोट्या घटनांवर चिडचिड करू नका. शांतता राखा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज महत्वाची कामे पूर्ण करा. मोठी गुंतवणुक कराल. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील. नोकरीत महिलांचे सहकार्य लाभेल. सुवासीके आणि शोभेचे दागिने विक्री करणार्यांना उत्तम लाभ होतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. व्यावसायिक जागेत बदल संभवतो. प्रवासाचे नियोजन बदलेल. जोडीदाराचे वागणे चमत्कारीक वाटेल. धर्म कार्यापासून दूर जात आहात. त्याची दखल घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. शेअर्स मध्ये यश मिळेल. धर्म कार्य करण्यास प्राधान्य द्याल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन उत्साही राहील. मात्र शत्रूचा त्रास जाणवेल. संपत्ती वाढेल मात्र कोर्टात अपेक्षित यश मिळणार नाही. आवडत्या व्यक्तीची भेट होईल. वरिष्ठ आणि सरकारी कामकाज यास वेळ द्यावा लागेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल. सध्या मन काहीसे अस्वस्थ आहे. त्यासाठी राहुचा जप करा.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. दिवसभरात महत्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. साडेसातीचा त्रास जाणवेल. संततीची काळजी वाटेल. श्री हनुमान उपासना करा.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] राहुकाळ – दुपारी १.३० ते दुपारी ३.०० […]

Don`t copy text!